ICC T20 World Cup 2026How Will Result Of Zim vs WI Match Affect India's SF Qualification Chances : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाला सुपर ८ मधील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पराभवाचा धक्का दिला. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवानंतर भारतीय संघाचे सेमीचं समीकरण जुळून येण्यासाठी गटातील अन्य दोन संघांच्या निकालही महत्त्वपूर्ण ठरेल. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीनंतर मुंबईतील वानखेडेच्या मैदानात सुपर ८ मधील पहिल्या गटातील झिम्बाब्वे आणि दोन वेळचा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यातील निकालाचा भारतीय संघावर काय परिणाम होईल? जाणून घेऊया सविस्तर
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
निकाल अन् नेट रनरेटसंदर्भातील गोष्ट
टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाला गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघानंतर आता वानखेडेच्या मैदानातील निकालानंतर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यापैकी विजेता संघ सेमीच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकेल. दोन्ही संघातील निकालासह या लढतीनंतर नेट रनरेटच्या बाबतीत काय चित्र पाहायला मिळेल, तेही महत्त्वाचे ठरेल.
"बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना!" भारताच्या पराभवानंतर 'खदखदून' हसला मोहम्मद आमिर!
WI vs ZIM सामना अटीतटीचा झाला तर टीम इंडियाला बसेल फटका
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना ७६ धावांनी गमावला होता. सध्याच्या घडीला टीम इंडियाचा नेट रनरेट मायनसमध्ये आहे. जर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना अटीतटीचा झाला तर भारतीय संघ गुणतालिकेत या दोन्ही संघांच्या मागेच राहिल. एवढेच नव्हे तर पुढच्या लढतीनंतर हा फॅक्टर सेमीच्या तिकीटासाठीही निर्णायक ठरू शकतो. त्यामुळेच वानखेडेच्या मैदानातील वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील लढत टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारी आहे.
सेमीफायनलसाठी कसे असेल समीकरण?
भारतीय संघ उर्वरित दोन सामने झिम्बाब्बे आणि वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघाने दोन्ही संघांना मोठ्या फरकाने पराभूत केले तर टीम इंडियासाठी सेमीचं तिकीट सहज मिळेल. पण इथं गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे.
- जर भारतीय संघाने उर्वरित दोन्ही सामने जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उर्वरित दोन सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आणि वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील विजेत्याने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले तर तीन संघाच्या खात्यात ४ गुण जमा होतील. या परिस्थितीत भारतीय संघाला थेट सेमीच तिकीट मिळणार नाही. इथं नेट रनरेट फॅक्टर लागू होईल.
- जर भारताने उर्वरित दोनपैकी फक्त एकच सामना जिंकला, तर या परिस्थितीतही टीम इंडिया सेमीच्या शर्यतीत टिकू शकते. पण या परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेने सर्व सामने जिंकायला हवेत. एवढेच नाही तर भारतीय संघाने जो एकमेव विजय मिळवला आहे तो झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यातील विजेत्याविरुद्ध असायला हवा. या परिस्थितीत भारत-वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे प्रत्येकी २-२ गुणांवर दिसतील. इथंही नेट रनरेटवर पुढचं गणित अवलंबून असेल.
Web Summary : India's T20 World Cup chances depend on the ZIM vs WI result after their loss to South Africa. A close ZIM vs WI game hurts India's net run rate. India needs big wins to ensure semi-final qualification; net run rate will be crucial.
Web Summary : दक्षिण अफ्रीका से हार के बाद भारत की टी20 विश्व कप की उम्मीदें ज़िम्बाब्वे बनाम वेस्ट इंडीज के परिणाम पर निर्भर करती हैं। ज़िम्बाब्वे बनाम वेस्ट इंडीज का करीबी मुकाबला भारत की नेट रन रेट को नुकसान पहुंचाता है। सेमीफाइनल में जगह बनाने के लिए भारत को बड़ी जीत की जरूरत है।