Zimbabwe Blessing Surpasses Mohammed Siraj Highest Wicket Taker In Tests 2025 : अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानी याने मोठा डाव साधला आहे. झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात २९ वर्षीय गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून देत ३ विकेट्सचा डाव साधला. या कामगिरीसह ब्लेसिंग मुझारबानी हा मोहम्मद सिराजला मागे टाकत यावर्षीतील टेस्टमधील बेस्ट गोलंदाज ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
... अन् झिम्बाब्वेच्या गड्यानं सिराजला टाकले मागे
वेस्ट इंडिज विरुद्धच्या घरच्या मैदानातील सामन्यात मोहम्मद सिराज याने सर्वोत्तम कामगिरी करताना यंदाच्या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जलदगती गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थान पटकावले होते. २०२५ मध्ये सिराजनं ३७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला मागे टाकत ब्लेसिंग मुझारबानी पुन्हा नंबर वन गोलंदाज ठरला आहे. १० सामन्यातील १४ डावात झिम्बाब्वेच्या या गड्याने आपल्या खात्यात ३९ विकेट्स जमा केल्या आहेत.
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
स्टार्कसह टॉप ५ मध्ये पाक अन् वेस्ट इंडिजचाही गोलंदाज
२०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुझारबानी आणि सिराजपाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचा नंबर लागतो. स्टार्कनं आतापर्यंत २९ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत २६ विकेट्स घेत पाकिस्तानचा नौमान अली चौथ्या तर वेस्ट इंडिजचा वॅरिकन २४ विकेटसह टॉप ५ मध्ये असल्याचे दिसून येते.
२०२५ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- ब्लेसिंग मुझारबानी - ३९ विकेट्स (झिम्बाब्वे)
- मोहम्मद सिराज - ३७ विकेट्स (भारत)
- मिचेल स्टार्क - २९ विकेट्स (ऑस्ट्रेलिया)
- नौमान अली - २६ विकेट्स (पाकिस्तान)
- जोमेल वॅरिकन - २४ विकेट्स (वेस्टइंडिज)
झिम्बाब्वेला या कसोटी सामन्यात मिळाली अवघ्या ३ धावांची आघाडीअफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात ब्रॅड एव्हान्स याने पाच विकेट्सचा डाव साधला. मुझारबानीनं त्याला उत्तम साथ दिली आणि झिम्बाब्वेच्या संघाने अफगाणिस्तानचा पहिला डाव १२७ धावांत आटोपला. गोलंदाजीत धमक दाखवल्यावर झिम्बाब्वेच्या संघाला फलंदाजीत सर्वोत्तम खेळ करता आला नाही. पण पहिल्या डावात १३० धावा करत यजमान झिम्बाब्वे संघानं या सामन्यात ३ धावांची आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले.
Web Summary : Zimbabwe's Blessing Muzarabani surpassed Mohammed Siraj as the highest Test wicket-taker in 2025 after taking 3 wickets against Afghanistan. He has 39 wickets in 10 matches, edging out Siraj's 37. Mitchell Starc, Nauman Ali, and Jomel Warrican follow in the top five.
Web Summary : अफ़ग़ानिस्तान के ख़िलाफ़ 3 विकेट लेकर ब्लेसिंग मुज़राबानी 2025 में सिराज से आगे निकल गए और टेस्ट में सबसे ज़्यादा विकेट लेने वाले गेंदबाज़ बने। मुज़राबानी के 10 मैचों में 39 विकेट हैं, जबकि सिराज के 37। शीर्ष पांच में स्टार्क, नौमान अली और वारिकन शामिल हैं।