Yuzvendra Chahal Dhanashree Verma Video: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांना उकळी फुटली. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यांबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जाताहेत. दोघांच्याही समर्थकांमध्ये सोशल मीडियावर वादही होताना दिसताहेत. अशातच एक व्हिडीओ समोर आलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
व्हिडीओमध्ये चहल-धनश्री काय बोललेत?
दोघांनी एक मुलाखत दिली होती. त्यातील एक भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चहल म्हणतो की, 'मी तिला स्पष्टच म्हणालो होती की, मला तुला डेट करायचं नाहीये. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे."
त्यानंतर धनश्री म्हणत आहे की, 'तो थेटच म्हणाला की, मला लग्नच करायचं आहे. आणि माझं असं झालेलं की काय??? मला अजूनही आठवतंय, युजवेंद्र म्हणालेला की, तू मला तुझा एक शनिवार देऊ शकते का? त्यानंतर मी माझ्या आईला सांगितले. माझ्या आईची पहिली प्रतिक्रिया तर अशी होती की, गया स्टुडण्ट (विद्यार्थी तर गेला)."
केआरके म्हणाला, 'यामुळेच तर उद्ध्वस्त झालास'
हा व्हिडीओ केआरकेने पोस्ट केला आहे. केआरकेने चहललाच सुनावलं आहे. "बेटा हीच तर हाव होती, ज्यामुळे तू उद्ध्वस्त झालास.' केआरकेच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
युजवेंद्र चहलची पोस्ट काय होती?
घटस्फोटाच्या चर्चांना तोंड फुटल्यावर युजवेंद्र चहल म्हणालेला, "माझ्या खासगी आयुष्याशी संबंधित गोष्टींबद्दल लोकांची उत्सुकता मी समजू शकतो. मी काही अशा सोशल मीडिया पोस्टही बघितल्या आहेत. ज्या खऱ्या असू शकतात आणि चुकीच्याही. एक मुलगा, एक भाऊ आणि एक मित्र या नात्याने मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो की, अशा तर्कविर्तकांमध्ये पडू नका. या कारणामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला खूप त्रास झाला आहे."
धनश्री वर्मा काय बोललेली?
सोशल मीडियावर याबद्दल ज्या चर्चा होताहेत, त्यावर धनश्री वर्मा म्हणालेली, "मागील काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप त्रासदायक राहिले आहेत. सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे कोणतीही वस्तुस्थिती जाणून न घेता निराधार गोष्टी लिहिल्या जात आहेत. द्वेष पसरवला जात आहे. मी माझं नाव आणि ओळख निर्माण करण्यासाठी अनेक वर्ष कष्ट केले आहेत. माझे मौन माझी कमकुवतपणा नाहीये, तर माझी ताकद आहे."