युवीनं MS धोनीसह कपिल पाजींची मागितली माफी; वडील योगराज यांच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच बोलला

 योगीराज यांनी कपिल पाजींसह धोनीवर केले होते गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 19:39 IST2026-04-02T19:37:15+5:302026-04-02T19:39:07+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Yuvraj Singh Apologises To MS Dhoni And Kapil Dev For His Father Yograj Singh Years Of Criticism | युवीनं MS धोनीसह कपिल पाजींची मागितली माफी; वडील योगराज यांच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच बोलला

युवीनं MS धोनीसह कपिल पाजींची मागितली माफी; वडील योगराज यांच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच बोलला

भारताला टी-२० आणि वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा माजी अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंग याने आपले वडील आणि माजी क्रिकेटर योगराज सिंग यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर मौन सोडले आहे. योगराज सिंग यांनी भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांच्यासह महेंद्रसिंह धोनीवर सातत्याने गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले होते. आपल्या वडिलांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल युवीनं पहिल्यांदाच भाष्य केले असून त्याने कपिल पाजींसह MS धोनीची माफी मागितली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मी कपिल देव आणि एमएस धोनी यांची माफी मागतो...

युवराज सिंग याने स्पोर्ट्स तकला एक खास मुलाखत दिली आहे. याचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून यात युवी म्हणतो की, "मला कपिल देव आणि एमएस धोनी यांची माफी मागायची आहे." या मुलाखतीत युवराज सिंगनं, किंग कोहली, रोहित शर्मा या स्टार खेळाडूंसह रिषभ पंत आणि अभिषेक शर्मासंदर्भातही मनातील गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. 

"जे घडलं ते..." LSG संघ मालक संजीव गोएंका यांचे कर्णधार रिषभ पंतसह संघासंदर्भात मोठं वक्तव्य

 योगीराज यांनी कपिल पाजींसह धोनीवर केले होते गंभीर आरोप
 
युवीचे वडील आणि  माजी क्रिकेर योगराज सिंग यांनी अनेकदा महेंद्रसिंह धोनीवर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले होते. युवराज सिंग आणखी काही वर्षे खेळला असता. MS धोनीनेच त्याचे करिअर संपवले, असा आरोप योगराज सिंग यांनी केला होता. एवढेच नाही तर त्यांनी कपिल देव यांनी आपल्याला संघातून बाहेर काढण्याची धमकी दिल्याचा दावाही त्यांनी केला होता.

योगराज सिंग यांनी IPL आधी कंल होतं MS धोनीचं कौतुक 

MS धोनीवर सातत्याने टीका करणाऱ्या योगराज सिंग यांनी IPL २०२६ च्या हंगामाआधी भारताच्या माजी कर्णधाराचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले होते. एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, एमएस धोनी हा अजूनही आयपीएलमध्ये खेळतो त्याचं कौतुक वाटते. त्याने कमलीचा फिटनेस दाखवून दिला पुढचे दहा वर्षे त्याने या स्पर्धेत खेळत राहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.
 

Web Title : युवराज सिंह ने पिता के बयानों के लिए धोनी, कपिल देव से मांगी माफी।

Web Summary : युवराज सिंह ने अपने पिता योगराज सिंह के विवादास्पद बयानों के लिए कपिल देव और एमएस धोनी से माफी मांगी। उन्होंने पहली बार इस मुद्दे पर बात की, साथ ही कोहली, रोहित और पंत के बारे में भी बात की।

Web Title : Yuvraj Singh apologizes to Dhoni, Kapil Dev for father's remarks.

Web Summary : Yuvraj Singh apologized to Kapil Dev and MS Dhoni for his father, Yograj Singh's controversial statements. He addressed the issue for the first time, also speaking about Kohli, Rohit, and Pant.