दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मानं २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १२ चेंडूत १७ धावांची खेळी करुन माघारी फिरला. पण या अल्प खेळीत त्याने एका कॅलेंडर ईयमध्ये १,५०० धावांचा टप्पा गाठत खास विक्रमाला गवसणी घातली. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवला मागे टाकत त्याने मैलाचा पल्ला गाठला. यंदाच्या वर्षात सर्वाधिक धावांसह अभिषेक शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात आपला दबदबा दाखवून दिला. आता त्याच्या नजरा किंग कोहलीच्या विक्रमावर असतील. रोहित शर्माची जागा घेतल्यावर धमाक्यावर धमाका करत वर्ष गाजवणाऱ्या अभिषेक शर्माच्या वर्षभरातील कामगिरीव खास नजर....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यंदाच्या वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये अभिषेक शर्माचा धमाक्यावर धमाका!
अभिषेक शर्मानं यंदाच्या वर्षात आतपर्यंत भारतीय संघासह पंजाब आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळलेल्या ३८ सामन्यातील ३७ डावात त्याने ४२.५४ च्या सरासरीसह २०३.२१ स्ट्राइक रेटनं १५१६ धावा केल्या आहेत. १४८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून यात ३ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. भारताच्या क्रिकेटरनं यंदाच्या वर्षात केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. आता अभिषेक शर्माला किंग कोहलीचा विक्रम मागे टाकून टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून एका वर्षांत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड खुणावत आहे. यासाठी त्याला फक्त ९९ धावांची आवश्यकता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील ४ सामन्यात तो हा विक्रम सहज आपल्या नावे करू शकतो.
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
भारताकडून किंग कोहलीच्या नावे टी-२० मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड
भारताकडून टी-२० मध्ये एका वर्षात सर्वाधक धावा करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे. २०१६ मध्ये कोहलीनं आपला दबदबा दाखवून देताना भारतीय संघासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून खेळताना ३१ सामन्यातील २९ डावात ८९.६६ च्या सरासरीसह १४७.१२ च्या स्ट्राइक रेटनं ४ शतके आणि १४ अर्धशतकाच्या मदतीने १६१४ धावा केल्या होत्या.
एका वर्षांत १०० षटकारांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय ठरला अभिषक शर्मा
यंदाच्या वर्षात आशिया कपच्या टीृ२० फॉरमॅटमध्ये ३०० धावा करणारा पहिला फलंदाज ठरलेल्या अभिषेक शर्मानं यंदाचं वर्ष गाजवताना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ स्पर्धेत पंजाबकडून खेळताना एका कॅलेंडर ईयरमध्ये १०० षटकारांचा आकडा पार केला होता. एका कॅलेंडर ईयरमध्ये षटकारांच शतक साजरे करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या रेकॉर्डसह त्याने वर्ष गाजवले आहे. आता किंग कोहलीचा विक्रम मागे टाकत त्याला वर्षाअखेर मोठा धमाका करण्याची संधी असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो हा टप्पाही पार करेल, अशी अपेक्षा आहे.