Join us

Year Ender 2024 : बुमराह जैसा कोई नहीं; कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ गोलंदाज

इथं एक नजर टाकुयात बुमराहस २०२४ मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेत वर्ष गाजवणाऱ्या गोलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:50 IST

Open in App

5 bowlers with most test wickets in 2024 : टी-२० वर्ल्ड कपचं वर्ष कसोटी क्रिकेटसाठीही एकदम खास राहिले. पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिवच्या दृष्टीने वर्षभरात महत्त्वाचे सामने पाहायला मिळाले. वर्षभर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप शर्यतीत जमेत नसलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्षाअखेरचा पाकिस्तान विरुद्धचा कसोटी सामना जिंकत WTC फायनलचं तिकीट पक्के केले. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मेलबर्न कसोटीतील पराभवामुळे या शर्यतीत टॉपला असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला. एका बाजूला भारतीय संघ जर तरच्या समीकरणात अडकणार असल्याचे चित्र दिसत असताना दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराहनं टेस्टमधील बेस्ट कामगिरीनं सर्वांच लक्षवेधून घेतलं. इथं एक नजर टाकुयात बुमराहस २०२४ मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेत वर्ष गाजवणाऱ्या गोलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर

 प्रभात जयसूर्या (श्रीलंका) - ४८ विकेट्स 

श्रीलंकेच्या ताफ्यातील प्रभात जयसूर्यानं २०२४ या वर्षात कसोटीत आपली वेगळी छाप सोडली. ९ सामन्यातील १८ डावात या गोलंदाजानं ३२.२० च्या सरासरीसह ४८ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील कसोटी सामन्यात ४२ धावा खर्च करून ६ विकेट्स ही प्रभात जयसूर्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.

 मॅट हेन्री (न्यूझीलंड) - ४८ विकेट्स

न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाज २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ९ सामन्यातील १८ डावात १८.५८ च्या सरासरीनं त्याने आपल्या खात्यात ४८ विकेट्स जमा केल्या. यात तीन वेळा त्याने पाच विकेट्सचा पराक्रम करुन दाखवला. ६७ धावा खर्च करून ७ विकेट्स ही मॅट हेन्रीची सर्वोच्च कामगिरी राहिली.

 शोएब बशीर (इंग्लंड) - ४९ विकेट्स

इंग्लंडचा  युवा फिरकीपटू शोएब बशीरनंही २०२४ या वर्षात कमालीच्या कामगिरीसह लक्षवेधून घेतले. १५ सामन्यातील २५ डावात ४०.१६  च्या सरासरीसह त्याने ४९ विकेट्स आपल्या खात्यात जमा करताना विकेट लिए। इस दौरान उन्होंने 3 बार पारी में 5 विकेट लेने का रिकॉर्ड बनाया और वेस्टइंडीज के खिलाफ नॉटिंघम में 5/41 उनका सर्वश्रेष्ठ प्रदर्शन रहा।

गस ॲटकिन्सन (इंग्लंड) - ५२  विकेट्स

इंग्लंडचा जलदगती गोलंदाजानं  २०२४ हे वर्ष एकदम खास राहिले. कारण याच वर्षी त्याने कसोटीत पदार्पण केले. ११  कसोटी सामन्यातील २१ डावात  २२.१५ च्या सरासरीसह ५२  विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. त्याने तीन वेळा ५ विकेट्स घेण्यासह एका सामन्यात १० विकेट्सचा पराक्रमही करून दाखवला. ४५ धावा खर्चून ७ विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली.

जसप्रीत बुमराह (भारत) - ७१ विकेट्स

कसोटी क्रमवारीत नंबर वन असणारा भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह इथंही नंबर वन आहे. बुमराहनं १३ कसोटी सामन्यातील २६ डावात १४.९२ च्या आश्चर्यकारक सरासरीसह ७१ विकेट्स घेतल्याआहेत. यात पाच वेळा त्याने पंजा मारला. विशाखापट्टणमच्यामैदानात इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने ४५ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या होत्या. ही बुमराहची वर्षातील सर्वोच्च कामगिरी ठरली.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाइयर एंडर 2024