Yashasvi Jaiswal Ananya Panday, Viral Video : टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी करून प्रसिद्धीझोतात आला. ऑस्ट्रेलियातही त्याने टीम इंडियासाठी किल्ला लढवला. एक मोठा मॅचविनर म्हणून आता त्याच्याकडे पाहिले जाते. इंग्लंड विरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. या मालिकेदरम्यान त्याला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधीही मिळू शकते. याचदरम्यान, यशस्वी जैस्वालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत एका स्पोर्ट्स शोमध्ये दिसला. त्यावेळचा त्यांचा दोघांचा संवाद चांगलाच व्हायरल झाला आहे.
जैस्वाल-अनन्यामध्ये काही झाली चर्चा?
या शो दरम्यान यशस्वी जैस्वाल आणि अनन्या पांडे यांच्यात मानसिक आरोग्य या विषयाबाबत विशेष चर्चा पाहायला मिळाली. व्हायरल व्हिडीओमध्ये अनन्या पांडे हिने जैस्वालला विचारलं की, "तू स्वत:बद्दल ऐकलेला किंवा वाचलेला असा काही विषय आहे का ज्यामुळे सामन्यापूर्वी किंवा सराव सत्रापूर्वी तुझे लक्ष विचलित झाले होते?" या प्रश्नाला उत्तर देताना यशस्वी जैस्वाल म्हणाला, "अशी कुठलीच गोष्ट नाही. मी कुठल्याही गोष्टींचा फारसा विचार करत नाही त्यामुळे माझ्यावर त्या गोष्टींचा काही परिणाम होत नाही." यानंतर अनन्या म्हणाली, "किती छान... मला जमलं असतं तर मलाही तुझ्यासारखं वागायला आवडलं असतं... मला गोष्टींचा विचार करायचा नसतो."
त्यानंतर यशस्वी पुढे म्हणतो, "मी फक्त माझ्या विचारात असतो. माझं माझ्या विचारांवर नियंत्रण असतं. मी काय करू शकतो हे मी स्वतःला सांगत असतो. त्यामुळेच मी खेळावर लक्ष केंद्रित करू शकतो. मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करत असतो. माझे सर्व लक्ष एकाच गोष्टीवर असते, ते म्हणजे मला खेळात काय करायचे आहे."
दुसरीकडे, सोशल मीडियाच्या प्रभावाबाबत बोलताना यशस्वी जैस्वाल म्हणाला, "कोणी काहीही म्हटले, कितीही टीका केली तरी मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. लोकांना त्यांचे मत सोशल मीडियावर व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मी त्याचा आदर करतो, पण मी त्या मतांचा विचार करून माझ्यावर त्याचा परिणाम होऊ देत नाही." दरम्यान त्याच्या या उत्तराने त्याची क्रिकेटवर्तुळातही वाहवा होताना दिसतेय.
Web Title: Yashasvi Jaiswal said he do not think much on criticism then Ananya Panday said i wish i could be like you
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.