Join us
Daily Top 2Weekly Top 5

WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने

WTC Final Scenario :  भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ३० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानातील ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:25 IST

Open in App

WTC Final Scenario :  भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ३० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात धक्का बसल्यामुळे ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल गाठण्याचं गणित बिघडण्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

ICC WTC स्पर्धा सोडून टीम इंडियानं आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिकंल्या

भारतीय संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा वगळता ICC च्या सर्व स्पर्धा जिंकल्या आहेत. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सलग दोन वेळा टीम इंडियाने फायनल गाठली. पण पहिल्या हंगामात न्यूझीलंड आणि दुसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलियन संघ टीम इंडियाच्या विजयाआड आला. गत हंगामात घरच्या मैदानात न्यूझीलंडच्या संघाने क्लीन स्विप दिल्यानं टीम इंडिया फायनलच्या शर्यतीतून आउट झाली होती. आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाच टेन्शन वाढवलं आहे. इथं एक नजर टाकुयात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या चक्रात फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला आणखी किती सामने खेळायचे आहेत? त्यात किती विजय टीम इंडियाचा फायनलचा मार्ग मोकळा करतील? यासंदर्भातील सविस्तर माहिती

प्रत्येक सामना महत्त्वाचा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघ WTC गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. भारतीय संघाला अजून १० कसोटी सामने खेळायचे आहेत. सर्वोत्तम विनिंग पर्सेंटेजसह अव्वल दोनमध्ये कायम राहून फायनलचा डाव साधण्यासाठी टीम इंडियाला किमान ७ सामने जिंकावे लागतील. याचा अर्थ उर्वरित प्रत्येक सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा असेल. भारतीय संघ उर्वरित १० कसोटी सामने कुठं अन् कुणाविरुद्ध खेळणार?

  • दक्षिण आफ्रिका (घरच्या मैदानात) – १ कसोटी (गुवाहाटी)
  • श्रीलंका (बाहेर) – २ कसोटी
  • न्यूझीलंड (बाहेर) – २ कसोटी
  • ऑस्ट्रेलिया (घरच्या मैदानात) – ५ कसोटी 

घरच्या मैदानातील पहिल्या पराभवानंतर टीम इंडियासाठी फायनलच्या शर्यतीत दावेदारी भक्कम करणं अधिक आव्हानात्मक झाले आहे. उर्वरित १० सामन्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित एका सामन्यासह ऑस्ट्रेलिया विरुद्धची पाच सामन्यांची मालिका भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. याशिवाय न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाला दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यात किमान ७ सामने जिंकण्याचा डाव साधणं सोप नसेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : India's WTC Final Hopes Dented: Must Win Seven More Matches

Web Summary : India's loss to South Africa jeopardizes their WTC final chances. To qualify, they need to win at least seven of the remaining ten matches against South Africa, Sri Lanka, New Zealand, and Australia. Home advantage and away series will be crucial for India.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा