WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने बॅटिंगमध्ये धमक दाखवत रचला इतिहास, ICC फायनलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:54 IST2025-06-13T19:51:40+5:302025-06-13T19:54:08+5:30

whatsapp join usJoin us
WTC Final SA vs AUS Mitchell Starc Becomes Frst Player To Score Half Century On Number 9 Or Below Batter In An ICC Final 2025 Also Broke 50 Years Record With Josh Hazlewood | WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WTC Final SA vs AU Mitchell Starc Record : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनल लढतीत ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याने फलंदाजीत धमक दाखवत इतिहास रचला आहे. लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात स्टार्कनं ११ वे अर्धशतक झळकावले. या सामन्यात १३६ चेंडूचा सामना करून तो ५८ धावांवर नाबाद राहिला. या खेळीसह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

ICC फायनलमध्ये असा पराक्रम करणारा पहिला खेळा़डू ठरला मिचेल स्टार्क

लॉर्ड्सच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या WTC फायनल सामन्यातील दुसऱ्या डावात मिचेल स्टार्क ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. नाबाद अर्धशतकासह तो आयसीसीच्या फायनलमध्ये नवव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक झळकवणारा पहिलाच खेळाडू  ठरला आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू कोर्टनी ब्राउन यांच्या नावे होता. २००४ च्या चॅम्पियनस ट्रॉफी फायनलमध्ये कॅरेबियन स्टार खेळाडूनं ३५ धावांची खेळी केली होती.  

WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?

ICC फायनलमध्ये नवव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  • मिचेल स्टार्क - ५८ धावा * (WTC फायनल, २०२५)
  • कोर्टनी ब्राउन - ३५ धावा (चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, २००४ )
  • इयान ब्रँडशॉ - ३४ धावा (चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, २००४)
     

स्टार्कनं हेजलवूडच्या साथीनं मोडला ५० वर्षांपूर्वीचा विक्रम

मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड या जोडीनं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलमध्ये १० विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी रचली. आयसीसीच्या फायनलमध्ये अखेरच्या जोडीनं केलेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली. याआधी हा विक्रम डेनिस लिली आणि जेफ थॉमसन या कॅरेबिन जोडीच्या नावे होता. १९७५ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत या दोघांनी १० व्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रली होती. स्टार्क-हेजलवूड जोडी ICC च्या फायनलमध्ये १० व्या विकेटसाठी ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी रचणारी पहिली जोडी ठरलीये.  

ICC फायनलमध्ये १० व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड

  • मिचेल स्टार्क- जोश हेजलवूड - ५९ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका  (WTC फायनल, २०२५)
  • डेनिस लिली आणि जेफ थॉमसन - ४१ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (वनडे वर्ल्ड कप फायनल, १९७५)
  • बलविंदर संधू आणि सैयद किरमानी - २२ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज ( वनडे वर्ल्ड कप फायनल, १९८३)

Web Title: WTC Final SA vs AUS Mitchell Starc Becomes Frst Player To Score Half Century On Number 9 Or Below Batter In An ICC Final 2025 Also Broke 50 Years Record With Josh Hazlewood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.