क्रिकेटच्या पंढरीत 'पंजा' मारण्याआधी पॅट कमिन्सनं केली ५० वर्षांपूर्वीची ती पुनरावृत्ती; या दिग्गजांच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री

 ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत कॅप्टन पॅट कमिन्सचा जलवा; रबाडानंतर त्यानंही मारला 'पंजा' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:35 IST2025-06-12T18:28:46+5:302025-06-12T18:35:40+5:30

whatsapp join usJoin us
WTC Final SA s AUS Australia Captain Dismissing Opposition Captain In Tests At Lords Pat Cummins Gets Temba Bavuma Wicket See Record | क्रिकेटच्या पंढरीत 'पंजा' मारण्याआधी पॅट कमिन्सनं केली ५० वर्षांपूर्वीची ती पुनरावृत्ती; या दिग्गजांच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री

क्रिकेटच्या पंढरीत 'पंजा' मारण्याआधी पॅट कमिन्सनं केली ५० वर्षांपूर्वीची ती पुनरावृत्ती; या दिग्गजांच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

South Africa vs Australia, WTC Final : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढत सुरु आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ २१२ धावांत आटोपल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावाची सुरुवात केली. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजांचा काही निभाव लागला नाही.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

दुसऱ्या दिवसातील पहिल्याच सत्रात पॅट कमिन्सनं साधला विकेटचा डाव

 पहिल्या दिवसाअखेर २२ षटकांत ४३ धावांवर दक्षिण आफ्रिका संघाचे ४ फलंदाज तंबूत परतले होते. दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात पॅट कमिन्स याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याला तंबूचा रस्ता दाखवला. या विकेटसह पॅट कमिन्स याने खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. 

IND vs ENG : रोहित-विराट शिवाय कसा वसूल करायचा 'लगान'? गंभीरनं दिला हा मंत्र जपण्याचा सल्ला

...अन् ५० वर्षानंतर क्रिकेटच्या पंढरीत जुळून आला हा कमालीचा योग

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात पॅट कमिन्सच्या रुपात ऑस्ट्रेलियन कर्णधारानं तब्बल ५० वर्षांनी प्रतिस्पर्धी संघातील कर्णधाराची विकेट घेतली आहे. याआधी १९०९ मध्ये मोटी नोबल या दिग्गजाने एर्ची मॅक्लोरेन याला दोन्ही डावात आउट केले होते. त्यानंतर १९७५ मध्ये इयान चॅपल यांनी टोनी ग्रेग या दिग्गजाची विकेट घेतल्याचा रेकॉर्ड आहे. पॅट कमिन्स हा आता या दिग्गजांच्या पक्तींत जाऊन बसला आहे.

 ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत कॅप्टन पॅट कमिन्सचा जलवा; रबाडानंतर त्यानंही मारला 'पंजा' 

आघाडीचे ४ फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर टेम्बा बावूमावर डाव सावरण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली. पण चांगला सेट झाल्यावर तो पॅट कमिन्सच्या जाळ्यात फसला.  त्याने ८४ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. दुसरीकडे रबाडानंतर पॅट कमिन्स WTC फायनलमध्ये आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवत 'पंजा' मारला आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या डेव्हिड बेडिंगहॅमची विकेट घेत त्याने पाच विकेट्स पूर्ण केल्या.  

 

Web Title: WTC Final SA s AUS Australia Captain Dismissing Opposition Captain In Tests At Lords Pat Cummins Gets Temba Bavuma Wicket See Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.