Join us

WTC Final, Ind Vs Aus: ओव्हलवर शुभमन गिलला तरुणीनं दिली लग्नाची ऑफर, त्यानंतर घडलं असं काही...

Shubman Gill: आज खेळाच्या तिसऱ्या दिवशी भारताचा डाव आटोपून ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात झाल्यावर मैदानात अशी एक घटना घडली. जिचे फोटो आणि व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 20:41 IST

Open in App

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ओव्हलवर सुरू आहे. या सामन्यामध्ये सद्यस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचं पारडं जड दिसत आहे. दरम्यान, आज खेळाच्या तिसऱ्या दिवशी भारताचा डाव आटोपून ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात झाल्यावर मैदानात अशी एक घटना घडली. जिचे फोटो आणि व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. 

भारताचा सलामीवीर शुभमन गिल टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात अपयशी ठरला. तो केवळ १३ धावा काढून बाद झाला. आज ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असताना त्याने लाबुशेनला धावचीत करण्याची एक चांगली संधी दवडली. त्याचदरम्यान, मैदानात एक गमतीशीर दृश्य दिसले. तिथे स्टेडियममध्ये सामना पाहत असलेल्या एका तरुणीने शुभमन गिलला लग्नाची मागणी घालणारा फलक झळकावला. त्यावर कॅमेरामनची नजर जाताच हा प्रसंग जगभरात पाहिला गेला. मात्र कॅमेरा शुभमन गिलकडे वळला असतात त्याने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. 

दरम्यान, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा काढल्यानंतर भारताचा पहिला डाव अवघ्या २९६ धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १७३ धावांची तगडी आघाडी मिळाली. संघ संकटात सापडला असताना अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे भारताला फॉलोऑनची नामुष्की टाळता आली.   

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशुभमन गिल
Open in App