Join us

WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!

मार्करम-टेम्बा बावुमा यांची शतकी भागीदारी, दक्षिण आफ्रिकेच्या संघाची इतिहास रचण्याच्या दिशेनं वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 21:49 IST

Open in App

WTC Final 2025  South Africa vs Australia : लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने दिलेल्या २८२ धावांचा पाठलाग करताना एडन मार्करमच्या दमदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवलीये. रायन रिकल्टन अवघ्या ६ धावांवर तंबूत परतल्यावर एडन मार्करम याने वियान मुल्डरच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे खांदे पाडले. वियान मुल्डर ५० चेंडूत २७ धावा करून माघारी फिरला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मार्करम-टेम्बा बावुमा यांची शतकी भागीदारी

दक्षिण आफ्रिकेटच्या संघाने ७० धावांवर आपली दुसरी विकेट गमावली.  त्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा मैदानात उतरला. त्याने   मार्करमला उत्तम साथ देत संघाला विजयाच्या दिशेनं नेणारी खेळी केली. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ १३८ धावांवरच आटोपला होता. पण दुसऱ्या डावातील ४१ व्या षटकात दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले आहे.

नवा चॅम्पियन मिळण्याचे संकेत

टेम्बा बावुमा याने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय अगदी योग्य ठरल्याचे दिसत आहे. पहिल्या दोन दिवसाच्या खेळात गोलंदाजांचा दबदबा राहिला. पण पहिल्या दोन दिवसाच्या खेळात ज्या प्रमाणे  गोलंदाजांना मदत मिळाली तशी मदत तिसऱ्या दिवशी मिळताना दिसत नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी कसोटीत नवा चॅम्पियन पाहायला मिळणार याचे संकेत दिसू लागले आहेत.  आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगामात न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली होती. गत हंगामात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपर स्पर्धेचा विजेता ठरला होता. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ त्या दिशेने वाटचाल करताना दिसून येते.   

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाद. आफ्रिकाआॅस्ट्रेलिया