WTC Final Temba Bavuma Unbeaten Captaincy Record In Test : लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चौथ्या दिवशीच गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाला चारीमुंड्या चित करत चांदीची गदा पटकावली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ऐतिहासिक विजयासह क्रिकेटची पंढरीत टेम्बा बावुमानं आपल्या कॅप्टन्सीतील रुबाब कायम राखत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, टेम्बा बावुमा हा क्रिकेटच्या इतिहासातील असा कर्णधार ठरलाय ज्याने पहिल्या १० कसोटी सामन्यातही एकही सामना गमावलेला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल जिंकत त्याने ९५ वर्षांचा विक्रमही मोडीत काढलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही! या शतकातील यशस्वी कॅप्टनची ९५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने लॉर्ड्सच्या मैदानातील लढाई जिंकली अन् या विजयासह टेम्बा बावुमा याने ९५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढलाय. २०२३ ते २०२५ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करताना टेम्बा बावुमाने १० पैकी ९ कसोटी सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. यातील एक सामना अनिर्णित राहिला आहे. या कामगिरीसह त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार पर्सी चॅपमन (Percy Chapman) या दिग्गजाचा विक्रम मोडीत काढला. १९२६ ते १९३० या कालावधीत इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करताना पर्सी चॅपमन या दिग्गजाने १० कसोटीतील ९ सामने जिंकले होते. एका सामन्यात त्याच्या पदरी पराभव आला होता.
कर्णधार | कालावधी | विजय | पराभव | अनिर्णित सामने |
टेम्बा बावुमा (दक्षिण आफ्रिका) | २०२३-२५* | ९ | ० | १ |
पी चॅपमन (इंग्लंड) | १९२६-३० | ९ | १ | ० |
डब्ल्यू आर्मस्ट्राँग (ऑस्ट्रेलिया) | १९२०-२१ | ८ | ० | २ |
जे डग्लस (इंग्लंड) | १९११-१४ | ८ | १ | १ |
रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया) | २००४-०५ | ८ | १ | १ |
टेम्बा बावुमानं २७ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला जिंकून दिली ICC ट्रॉफी
दक्षिण आफ्रिकेचा संघ हा नेहमीच तगडा असतो. पण आयसीसी स्पर्धेत संघाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच या संघाला 'चोकर्स'चा ठपकाही लागला. पण २७ वर्षांनी टेम्बानं आपल्या कॅप्टन्सीचा रुबाब कायम ठेवत हा ठपका पुसला. याआधी १९९८ मध्ये दिवंगत क्रिकेटर हॅन्सी क्रोनिए (Hansie Cronje) याने आयसीसी नॉक आउट ट्रॉफी स्पर्धेत (सध्याच्या नाव आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी) ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजच्या संघाला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली होती. टेम्बा बावुमा हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा दुसरा कॅप्टन ठरला आहे.