राहुल द्रविडने ज्याला दिला निवृत्तीचा सल्ला, त्यानेच केलाय कल्ला! WTC Final मध्ये कमबॅकसाठी सज्ज

WTC Final 2023: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ नंतर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्यासाठी लंडनला रवाना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 04:26 PM2023-05-08T16:26:57+5:302023-05-08T16:27:27+5:30

whatsapp join usJoin us
WTC Final 2023: Wriddhiman Saha to replace KL Rahul in IND vs AUS Oval clash, Head Coach Rahul Dravid give him retirement advice | राहुल द्रविडने ज्याला दिला निवृत्तीचा सल्ला, त्यानेच केलाय कल्ला! WTC Final मध्ये कमबॅकसाठी सज्ज

राहुल द्रविडने ज्याला दिला निवृत्तीचा सल्ला, त्यानेच केलाय कल्ला! WTC Final मध्ये कमबॅकसाठी सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WTC Final 2023: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ नंतर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्यासाठी लंडनला रवाना होणार आहे. दुखापतीचे ग्रहण भारतीय संघावर कायम आहेच आणि त्यामुळे संघाची मोठ बांधताना कर्णधार रोहित शर्माच्या नाकी नऊ येणार हे नक्की आहे. रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर यांनी दुखापतीमुळे आधीच माघार घेतली. तरीही BCCI ने १५ सदस्यीय संघ जाहीर केला, जो ७ ते ११ जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल खेळणार आहे. पण, त्यातल्या KL Rahul ला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली अन् अडचण निर्माण झाली. 

Asia cup 2023 पाकिस्तानात खेळवण्यास BCCI सह आणखी दोन देशांचा नकार! PCBला धक्का 


टीम इंडियाची मधली फळी मजबूत करण्यासाठी बीसीसीआयने अजिंक्य रहाणेला पुनरागमनाची संधी दिली. आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना अजिंक्याच सकारात्मक खेळ पाहून बीसीसीआयने त्याला संघात पुन्हा घेतले. असाच एक करिष्मा होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात केएस भरत हा एकमेव यष्टिरक्षक-फलंदाज आहे. लोकेश राहुलने माघार घेतल्याने आता बीसीसीआय यष्टिरक्षक-फलंदाजाचा पर्याय शोधत आहेत आणि अशात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने काही वर्षांपूर्वी ज्याला निवृत्तीचा सल्ला दिला, त्या वृद्धीमान साहा ( Wriddhiman Saha ) संघात पुन्हा बोलावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या साहाने आयपीएल २०२३ आपल्या कामगिरीने गाजवले आहे.


वृद्धिमान साहाला टीम इंडियातून वगळल्यानंतर बराच वाद झाला होता. साहाने उघडपणे सांगितले होते की बीसीसीआयचे तत्कालीन प्रमुख सौरव गांगुली यांनी त्याला संघात ठेवण्याचे आश्वासन दिले होते, तर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वरिष्ठ पत्रकाराशी झालेल्या वादासह त्याचे भविष्य ठरवण्यास सांगितले होते. साहा म्हणाला की, द्रविडने त्याला दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता. राहुल द्रविडनेही आपण तसे बोलल्याचे मान्य केले होते. 


IPL 2023 मध्ये काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या सलामीवीराने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने ४३ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकार मारत ८१ धावा केल्या.  साहा धावा करत असताना कोहलीने त्याच्यासाठी इंस्टाग्रामवर पोस्ट केली. त्याने स्तुती करताना लिहिले , काय खेळाडू आहे….  

 

Web Title: WTC Final 2023: Wriddhiman Saha to replace KL Rahul in IND vs AUS Oval clash, Head Coach Rahul Dravid give him retirement advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.