ठळक मुद्देआजपासून ते 22 जून या कालावधीत भारत-न्यूझीलंड यांच्यात हा ऐतिहासिक सामना होणार आहे.
World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचा अडीच तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे. आजपासून ते 22 जून या कालावधीत भारत-न्यूझीलंड यांच्यात हा ऐतिहासिक सामना होणार आहे. पण, या पाचही दिवसांवर पावसाचे सावट आहे. या सामन्याचा निकाल लागावा यासाठी आयसीसीनं 23 जून हा राखीव दिवस ठेवला आहे, पंरतु त्यासाठीही काही नियम घातले गेले आहेत. आता पहिल्याच दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानं राखीव दिवसाचा वापर होईल का?
2019ला इंग्लंडला झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतही पावसामुळे
आयसीसीनं बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला होता. भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या उपांत्य फेरीच्या सामन्याचा निकाल राखीव दिवशी लागला होता. भारत-पाकिस्तान यांच्यातली लढतही पावसामुळे दोन दिवस चालली.
WTC फायनलचा राखीव दिवस कधी वापरला जाईल?, आयसीसीचा नियम काय सांगतो ?आयसीसीनं WTC Final साठी 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. जर कसोटी सामन्यातील वाया गेलेला वेळ पाच दिवसांच्या खेळात भरून न निघाल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल. वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी पुढील दिवशी सामना 30 मिनिटे आधी सुरू केला जाईल किंवा दिवसअखेर 30 मिनिटांचा अधिक खेळ होईल. पण, आता या कसोटीचा पहिलाच दिवस पावसामुळे वाया गेल्यानं राखीव दिवसाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यातही निकाल न लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाईल. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final
विजेत्या संघाला मिळणार 1.6 मिलियन डॉलर तर उपविजेत्याला...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील विजेत्या संघाला आयसीसीकडून 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 11 कोटी 71 लाख, 74,022.40 इतकी बक्षीस रक्कम दिली जाणार आहे, तर उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 5 कोटी 85 लाख 87,011.20 रुपये दिले जातील. आयसीसीचे CEO जेफ अॅलार्डीस यांनी ही माहिती दिली. जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांमध्ये बक्षीस रक्कमेची समान विभागणी केली जाईल. WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today, IND vs NZ World Test Championship