Join us  

WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी; केन, साऊदीची दमदार खेळी

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : शमी व इशांत यांनी पहिल्या सत्रात तीन विकेट्स घेताना किवींची अवस्था ५ बाद १३५ अशी केली होती. पण, केन विलियम्सनच्या निर्धारानं टीम इंडियाचं टेंशन वाढवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 8:56 PM

Open in App

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : पाचव्या दिवसाचा मान मोहम्मद शमीला ( Mohammed Shami ) नावावर राहिली. शमीनं अप्रतिम गोलंदाजी करून न्यूझीलंडला ४ धक्के दिले. शमी व इशांत यांनी पहिल्या सत्रात तीन विकेट्स घेताना किवींची अवस्था ५ बाद १३५ अशी केली होती. पण, केन विलियम्सनच्या निर्धारानं टीम इंडियाचं टेंशन वाढवलं. केननं खेळपट्टीवर तग धरून तळाच्या फलंदाजांसोबत किवींना पहिल्या डावात आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी १००+ धावा जोडून पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या टीम इंडियाचा मनसुबा हाणून पाडला. केननं १७७ चेंडूंत ६ चौकारांसह ४९ धावा केल्या. WTC Final Today, Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today

 

मोहम्मद शमीनं किवींना हादरवलं, पण त्याच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधलं; महिला प्रेक्षकांसमोर केलं असं काही...

भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गडगडल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी दिली. आर अश्विन व इशांत शर्मा यांनी त्यांना माघारी पाठवले. केन विलियम्सन व रॉस टेलर ही जोडी बचावात्मक खेळ करून भारतीय गोलंदाजांची कसोटी पाहत होती. पण, पाचव्या दिवशी मोहम्मद शमीनं किवींना धक्का दिला. त्यानं रॉस टेलरला ( ११) बाद केले. कव्हरवर उभ्या असलेल्या शुबमन गिलनं हवेत झेपावत झेल टिपला अन् टेलरला माघारी जाण्यास भाग पाडले.  केन व टेलर यांनी ८८ चेंडूंत १६ धावांची भागीदारी केली. WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today

त्यानंतर आलेल्या हेन्री निकोल्सला ( ७) इशांत शर्मानं रोहित शर्माच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले.  शमीने पुढच्या षटकात किवींना आणखी एक धक्का दिला अन् बीजे वॉटलिंगचा त्रिफळा उडवला. कॉलिन डी ग्रँडहोम ( १३) व कायले जेमिन्सन ( २१) यांनी पिछाडी भरून काढण्यासाठी झटपट धावा केल्या. पण, त्यांनाही शमीनं माघारी पाठवले. किवींचा निम्मा संघ माघारी परतला तेव्हा ते ८२ धावांनी पिछाडीवर होते अन् सातवी विकेट पडेपर्यंत ही पिछाडी २५ धावांपर्यंत कमी झाली होती. केन एका बाजूनं खेळपट्टीवर तग धरून होता अन् त्यानं तळाच्या फलंदाजांना सोबतीला घेऊन न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली. इशांत शर्मानं त्याची विकेट घेतली. पाचव्या दिवसाचे पहिलेच षटक टाकणाऱ्या आर अश्विननं किवींना ९वा झटका दिला. टीम साऊदीनं ४६ चेंडूंत ३० धावा करताना न्यूझीलंडची आघाडी ३२ धावांपर्यंत नेली. किवींचा पहिला डाव २४९ धावांवर गडगडला. शमीनं चार, इशांतनं तीन व आर अश्विननं दोन विकेट्स घेतल्या. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंडकेन विल्यमसनमोहम्मद शामी