WTC Final 2021 IND vs NZ : मोहम्मद शमीनं किवींना हादरवलं, पण त्याच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधलं; महिला प्रेक्षकांसमोर केलं असं काही...

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami ) न्यूझीलंडला दोन मोठे धक्के दिले आणि त्यात इशांत शर्मानंही हात साफ करून घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 06:30 PM2021-06-22T18:30:15+5:302021-06-22T18:30:35+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : Lunch on Day 5, New Zealand 135 for 5, Mohammed Shami New dress code goes viral  | WTC Final 2021 IND vs NZ : मोहम्मद शमीनं किवींना हादरवलं, पण त्याच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधलं; महिला प्रेक्षकांसमोर केलं असं काही...

WTC Final 2021 IND vs NZ : मोहम्मद शमीनं किवींना हादरवलं, पण त्याच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधलं; महिला प्रेक्षकांसमोर केलं असं काही...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : पाचव्या दिवसाचे पहिले सत्र भारताच्या नावावर राहिले. मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami ) न्यूझीलंडला दोन मोठे धक्के दिले आणि त्यात इशांत शर्मानंही हात साफ करून घेतला. या दोघांनी पहिल्या सत्रात तीन विकेट्स घेताना किवींची अवस्था ५ बाद १३५ अशी केली आहे. न्यूझीलंडचा संघ अजूनही ८२ धावांनी पिछाडीवर आहे आणि कर्णधार केन विलियम्सनवर त्यांची मदार आहे. दरम्यान, किवींना धक्का देणाऱ्या शमीची एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे आणि सोशल मीडियावर त्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे महिला प्रेक्षकांसमोर त्यानं ही कृती केली आहे...  Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today

जसप्रीत बुमराहनं केली एक चूक; पहिलं षटक टाकताच ड्रेसिंग रूमच्या दिशेनं पळत सुटला

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गडगडल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी देताना टीम इंडियाला हैराण केले. आर अश्विन व इशांत शर्मा यांनी किवी सलामीवीरांना माघारी पाठवले. केन विलियम्सन व रॉस टेलर ही जोडी बचावात्मक खेळ करून भारतीय गोलंदाजांची कसोटी पाहत होती. पण, पाचव्या दिवशी मोहम्मद शमीनं किवींना धक्का दिला. त्यानं रॉस टेलरला ( ११) बाद केले. कव्हरवर उभ्या असलेल्या शुबमन गिलनं हवेत झेपावत झेल टिपला अन् टेलरला माघारी जाण्यास भाग पाडले.  IND vs NZ World Test Championship,WTC Final Today

किवींना बसले धक्के, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शुबमन गिलची फ्लाईंग कॅच, Video 




केन व टेलर यांनी ८८ चेंडूंत १६ धावांची भागीदारी केली. पण, शमीनं ही जोडी तोडली. त्यानंतर आलेल्या हेन्री निकोल्सला ( ७) इशांत शर्मानं रोहित शर्माच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले.  शमीने पुढच्या षटकात किवींना आणखी एक धक्का दिला अन् बीजे वॉटलिंगचा त्रिफळा उडवला. पाचव्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा किवींचा निम्मा संघ माघारी परतला होता. दरम्यान, मोहम्मद शमी मैदानावर टॉवेल गुंडाळून उभा असलेला सर्वांनी पाहिला. सीमारेषेनजीक उभा असलेल्या शमीचा टॉवेल गुंडाळलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात महिला प्रेक्षक त्याच्या मागे दिसत आहेत. लंच ब्रेक झाल्यानंतर शमी तसाच टॉवेल गुंडाळून ड्रेसिंग रुममध्ये गेला.  WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today





Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Lunch on Day 5, New Zealand 135 for 5, Mohammed Shami New dress code goes viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.