WPL 2026 : कोण आहे Mallika Sagar? IPL मेगा लिलावात तिच्याकडून झालेल्या ३ मोठ्या चुका

कोण आहे मल्लिका सागर? जी पुन्हा एकदा WPL मध्ये ऑक्शनरीच्या रुपात ठरतीये लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:52 IST2025-11-27T14:51:03+5:302025-11-27T14:52:30+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
WPL 2026 Who is Mallika Sagar Female auctioneer Did 3 Blunders During IPL Mega Auction Mega 2025 | WPL 2026 : कोण आहे Mallika Sagar? IPL मेगा लिलावात तिच्याकडून झालेल्या ३ मोठ्या चुका

WPL 2026 : कोण आहे Mallika Sagar? IPL मेगा लिलावात तिच्याकडून झालेल्या ३ मोठ्या चुका

WPL Auction 2026 : महिला प्रीमियर लीगच्या पहिला मेगा लिलाव २७ नोव्हेंबर२०२५ रोजी, नवी दिल्लीत पार पडणार आहे. या मेगा लिलावात एकूण १७७ महिला खेळाडूंनी नाव नोंदणी केली असून ७३ स्लॉट भरण्यासाठी पाच फ्रँचायझी संघ खेळाडूंवर बोली लावताना दिसतील. खेळाडूंशिवाय या मेगा लिलावात पुन्हा एकदा ऑक्शनरच्या रुपात मल्लिका सागर हा चेहरा लक्षवेधी ठरताना दिसत आहे. इथं जाणून घेऊयात या सुंदर चेहऱ्यासंदर्भातील काही खास गोष्टी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कोण आहे मल्लिका सागर? जी पुन्हा एकदा WPL मध्ये ऑक्शनरीच्या रुपात ठरतीये लक्षवेधी

मल्लिका सागर हिने वेगवेगळ्या ऑक्शनमध्ये आपली खास छाप सोडली आहे. लिलावकर्ता म्हणून जवळपास २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या मल्लिका सागरने याआधी WPL शिवाय IPL आणि प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील ऑक्शनरच्या रुपात जबाबदारी बजावली आहे. फिलाडेल्फियामधील ब्रायन मावर कॉलेजमध्ये कला विभागातील इतिहास विषयात शिक्षण घेणाऱ्या मलिक्कानं मुंबईतील प्रसिद्ध पुंडोल आर्ट गॅलरीमध्ये अनेक लिलाव प्रक्रियेत भाग घेतला आहे. वयाच्या २६ व्या वर्षी ती क्रिस्टीजची पहिली भारतीय महिला लिलावकर्ती ठरली होती. २०२३ मध्ये ह्यू एडमेड्स यांच्या जागी आल्यावर ती आता BCCI ची कायमस्वरुपी लिलावकर्ती झाली आहे.

WPL 2026 Auction : ८ मार्की प्लेयर्समध्ये 'या' दोघींची बेस प्राइज ५० लाखांपेक्षा कमी; पण...

२०२५ च्या IPL मेगा लिलावात तिच्याकडून घडलेल्या ३ मोठ्या चुका

  • आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात मल्लिका सागर हिने  मनवंत कुमार (Manvanth Kumar) या अनकॅप्ड खेळाडूची बेस प्राइज ३० लाखांऐवजी ३० कोटी अशी सांगितली होती. तिने आपली चूक क्षणात सुधारली. पण हा मुद्दा त्यावेळी चांगलाच गाजला होता. 
     
  • या मेगा लिलावात तिने अर्जुन तेंडुलकरचा उल्लेख अर्जुन इंडियन्स असा केला होता. या मेगा लिलावात पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिल्यावर मुंबई इंडियन्सच्या संघाने अर्जुन तेंडुलकरला ३० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात घेतले होते. 
     
  • IPL मेगा लिलावात १९ वर्षीय स्वास्तिक चिकारावरील बोली वेळी RCB आणि DC यांच्यात ड्रामा पाहायला मिळाला होता. लिलावातील नियमानुसार, एकदा हातोडा मारला कीस खेळाडूची विक्री फायनल मानली जाते. यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पॅडल उचले असताना मल्लिकाने RCB साठी डील पक्की केली, असा आरोप झाला होता. मल्लिकानेही एवढ्या वेगाने पार पडत असलेल्या लिलावात अशी चूक होऊ शकते, ही गोष्ट मान्य केली होती. दिल्ली कॅपिटल्सचे तत्कालीन मुख्य कोच हेमांग बदानीच्या विरोधानंतरही चिकारा ३० लाख बेस प्राइजसह RCB च्या ताफ्यात गेला होता.
     

Web Title : डब्ल्यूपीएल 2026: मल्लिका सागर और आईपीएल नीलामी में उनकी 3 गलतियाँ।

Web Summary : मल्लिका सागर, जिनके पास 25+ वर्षों का नीलामी अनुभव है, डब्ल्यूपीएल 2026 में वापसी कर रही हैं। आईपीएल 2025 की नीलामी में, उन्होंने गलत कीमतों का हवाला दिया और बोली युद्धों के दौरान आलोचना का सामना किया।

Web Title : WPL 2026: Mallika Sagar, and her 3 mistakes in IPL auction.

Web Summary : Mallika Sagar, with 25+ years auction experience, returns to WPL 2026. In the IPL 2025 auction, she mistakenly quoted incorrect prices and faced criticism during bidding wars.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.