WPL 2026 RCB Into The Final : ग्रेस हॅरिसच्या ७५ धावांच्या धमाकेदार खेळीनंतर स्मृती मानधनाच्या बॅटमधून आलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने यूपी वॉरियर्सला ८ विकेट्सने पराभूत करत फायनल गाठली आहे. वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात मेग लेनिंगच्या यूपी वॉरियर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १४३ धावा करत RCB समोर १४४ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना स्मृतीच्या संघाने १४ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सामना जिंकत दुसऱ्या जेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
दीप्तीचं अर्धशतक, मेग लेनिंगची दमदार खेळी, पण या दोघींची विकेट पडली अन्...
स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. UP वॉरियर्सची कर्णधार मेग लेनिंग आणि दीप्ती शर्मानं हा निर्णय फोल ठरवत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ४९ चेंडूत ७४ धावांची भागीदारी रचली. नेडीन डि क्लर्कने ही जोडी फोडत UP च्या संघाला पहिला धक्का दिला. मेग लेनिंग ३० चेंडूत ४१ धावा करून माघारी फिरली. श्रेयंका पाटीनं अर्धशतक झळकवणाऱ्या दीप्तीला ५५ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या दोघींची विकेट पडल्यावर RCB नं सामन्यावर पुन्हा पकड मिळवली. हरलीन देओलच्या १४ आणि सिमरन शेखच्या १० धावा वगळता अन्य कोणत्याही बॅटरला RCB गोलंदाजांनी दुहेरी आकडा गाठू दिला नाही. परिणामी निर्धारित २० षटकात UP वॉरियर्सच्या संघाला ८ विकेट्सच्या मोबदल्यात १४३ धावांपर्यंतच मजल मारता आली.
नॅटली ते स्मृती! WPL इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या 'रनरागिणी'
स्मृती-ग्रेसची शतकी भागीदारी, RCB ची फायनलमध्ये धडक
UP वॉरियर्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ग्रेस हॅरिसनं RCB च्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. दुसऱ्या बाजूला स्मृती संयमी अंदाजात तिला साथ देताना दिसली. RCB च्या या सलामी बॅटर्संनी पहिल्या विकेटसाठी ५५ चेंडूत १०८ धावांची दमदार भागीदारी करत सामना RCB च्या बाजून एकहाती केला. ग्रेस ३७ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७५ धावा करून बाद झाली. तिची जागा घेण्यासाठी आलेल्या जॉर्जिया वोलनं १५ चेंडूत १६ धावा करून पॅव्हेलियनचा रस्ता धरला. दुसऱ्या बाजूला स्मृतीनं आपल्या खेळीची गती वाढवली. तिने २७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २०० च्या स्ट्राइक रेटनं नाबाद ५४ धावा करत संघाला फायनलचं तिकीट मिळवून दिले.
Web Summary : Grace Harris's 75 and Smriti Mandhana's unbeaten fifty powered RCB to the WPL 2026 final, defeating UP Warriors by 8 wickets. RCB chased down the 144-run target with ease, securing their place in the championship match.
Web Summary : ग्रेस हैरिस के 75 और स्मृति मंधाना के नाबाद अर्धशतक से आरसीबी ने यूपी वॉरियर्स को 8 विकेट से हराकर डब्ल्यूपीएल 2026 के फाइनल में प्रवेश किया। आरसीबी ने 144 रनों का लक्ष्य आसानी से हासिल कर लिया।