WPL 2026 Schedule Announced : वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) च्या चौथ्या हंगामातील सामने ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडणार आहे. या हंगामासाठी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि वडोदरा ही दोन ठिकाणे अधिकृतपणे ठरवण्यात आली आहेत. नवी मुंबईच्या मैदानातून आगामी हंगामाची सुरुवात होईल. जवळपास महिनाभर रंगणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम सामना ५ फेब्रुवारीला वडोदराच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. WPL च्या मेगा लिलावात यासंदर्भातील मोठी घोषणा करण्यात आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आतापर्यंतच्या तीन हंगामता दोन वेळा मुंबई इंडियन्सने मारलीये बाजी
WPL च्या पहिला हंगाम २०२३ मध्ये खेळवण्यात आला होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI) संघाने मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाला पराभूत करत पहिली वहिली स्पर्धा गाजवली होती.२०२४ च्या दुसऱ्या हंगामात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने ही स्पर्धा गाजवली होती. यावेळीही दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. २०२५ च्या हंगामात फायनलमध्ये पुन्हा पहिल्या हंगामातील चित्र पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.
WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)
या तीन फ्रँचायझी संघाची पाटी कोरी
आता नव्या हंगामात पुन्हा मुंबई इंडियन्सचा दबदबा पाहायला मिळणार की, नवा चॅम्पियन मिळणार ते पाहण्याजोगे असेल. तीन वेळा फायनल खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघासह UP वॉरियर्स आणि गुजरात जाएंट्स संघ अजूनही पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहेत. महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. ज्या मैदानात भारतीय संघाने इतिहास रचला त्याच मैदानातून WPL च्या आगामी हंगामाला सुरुवात होणार आहे. महिला संघाच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे आगामी WPL हंगामाला आधीच्या तुलनेत अधिक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.