WPL 2026 Gujarat Giants Women vs Delhi Capitals Women, Eliminator Nandani Sharma Record : वडोदराच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात WPL च्या यंदाच्या हंगामातील एलिमिनेटरचा अर्थात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्स हिने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. तिचा निर्णय दिल्लीच्या ताफ्यातील गोलंदाजांनी सार्थ ठरवला. त्यात यंदाच्या हंगामातील हॅटट्रिक क्वीन नंदिनी शर्मा हिने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीतील कमाल दाखवून देत नवा इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तोच संघ, पुन्हा हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहचलेली नंदिनी, हा डाव हुकला, पण...
साखळी फेरीत गुजरात जाएंट्सच्या संघाविरुद्ध हॅटट्रिकचा डाव साधणारी नंदिनी पुन्हा एकदा गुजरात विरुद्ध हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहचली होती. सेफी डिवाइनच्या रुपात गुजरातच्या संघाने दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली. त्यानंतर अनुष्का शर्मा मैदानात उतरली. यंदाच्या हंगामात या युवा बॅटरनं सर्वांना प्रभावित केले होते. पण सेमीफायनल लढतीत ती फिकी ठरली. पॉवर प्लेमधील सहाव्या षटकात जेमीनं चेंडू नंदिनीकडे सोपवला. ती आली अन् सहाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तिने अनुष्का शर्माची विकेट घेतली. पुढच्या चेंडूवर तिने गुजरातची कर्णधार अॅश्ले गार्डनर हिलाही आपल्या जाळ्यात अडकवले अन् एका हंगामात दुसऱ्यांदा ती हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहचली. हा डाव साध्य झाला नसला तरी बॅक टू बॅक दोन विकेट्स घेत नंदिनी शर्मानं WPL मध्ये नवा इतिहास रचला आहे.
WPL 2026 : कोण आहे नवी ‘हॅटट्रिक क्वीन’? रातोरात स्टार झालेल्या छोरीचा गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रवास
असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
नंदिनी शर्मा हिने बॅक टू बॅक दोन विकेट्स घेत यंदाच्या हंगामात १६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. या कामगिरीसह ती WPL च्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारी भारतीय गोलंदाज ठरली आहे. याआधी हा विक्रम सायका इशाक हिच्या नावे होता. २०२३ च्या पहिल्या वहिल्या हंगामात तिने १५ विकेट्स घेतल्या होत्या. आता हा विक्रम दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूच्या नावे झाला आहे.