WPL 2026 Gautami Naik Gets Surprise Video Message From Hero Hardik Pandya : महिला प्रीमियर लीग (WPL 2026) च्या चौथ्या हंगामात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने (RCB Women) सलग पाचव्या विजयासह अगदी दाबात प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारली. वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर झालेल्या WPL 2026 मधील १२ व्या सामन्यात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB संघाकडून गौतमी नाईकचा जबरदस्त परफॉमन्स
स्मृती मंधाना २६ धावा करुन माघारी फिरल्यावर RCB संघाच्या आघाडीच्या फळीतील बॅटर्संनी निराश केले. संघ अडचणीत असताना रायझिंग स्टार गौतमी नाईकनं जबरदस्त परफॉमन्स दिला. तिने ५५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ७३ धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर निर्धारित २० षटकांत ६ विकेट्सच्या मोबदल्यात १७८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात जाएंट्सचा संघ ११७ धावांत आटोपला.
Smriti Mandhana Heartbreak! : स्वप्न साकारत असतानाच मोडला डाव; लकीमुळं स्मृती ठरली अनलकी! अन्...
प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारणारी पहिली टीमही ठरली RCB
धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सकडून अॅश्ली गार्डनरने अर्धशतक झळकावले. तिने केलेल्या ५४ धावांच्या खेळीशिवाय अनुष्का शर्माने केलेल्या १८ धावा वगळता अन्य एकाही बॅटरला धमक दाखवता आली नाही. परिणामी गुजरातच्या संघाला ६१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे सलग पाचव्या विजयासह RCB च्या संघाने प्लेऑफ्सचं तिकीट मिळवले. RCB यंदाच्या हंगामात प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारणारी पहिली टीमही ठरली.
हार्दिक पांड्याला आदर्श मानते गौतमी! शेअर केली खास गोष्ट
WPL मधील पहिले अर्धशतक झळकावल्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच ठरलेल्या गौतमी नाईकने हार्दिक पांड्याला फॉलो करते, असे सांगितले. भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या तिचा आयडॉल आहे. ती म्हणाली "मी त्याच्याकडून खूप काही शिकते. दबावाच्या परिस्थितीत तो ज्या पद्धतीने शांत राहून खेळावर ताबा मिळवतो, ते मला खूप आवडतं. मीही तसंच खेळू इच्छिते,” असे गौतमीने RCB ने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले.
हार्दिक पांड्याचा खास व्हिडिओ संदेश
या सामन्यानंतर गौतमीसाठी एक खास क्षण आला. हार्दिक पांड्याने स्वतः व्हिडिओ संदेश पाठवत तिला शुभेच्छा दिल्या. “हाय गौतमी, हार्दिक बोलतोय. मी तुझा आयडॉल आहे हे ऐकून खूप छान वाटलं. तुझ्या पहिल्या अर्धशतकाबद्दल मनापासून अभिनंदन. खेळाचा आनंद घे, शिस्तबद्ध खेळीवर भर दे. पुढे जाताना आपल्या फ्रँचायझीसाठी व देशासाठी अजून चांगली कामगिरी कर," असे हार्दिक म्हणाला.
हार्दिकच्या व्हिडिओ मेसेज अन् गौतमी झाली भावूक
हार्दिकचा संदेश ऐकून गौतमी भावूक झाली. हा क्षण अविस्मरणीय असल्याचे सांगत तिने हार्दिकला आगामी टी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. "माझ्या भावना शब्दांत मांडू शकत नाही. माझा आयडॉल मला मेसेज करतोय, याचा अर्थ मी आयुष्यात खूप काही मिळवल्याचं समाधान आहे. हार्दिक सर, मला तुम्हाला भेटायचं आहे. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. वर्ल्ड कपसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा—भारताला वर्ल्ड कप जिंकून द्या,” असे गौतमी नाईक म्हणाली.