Join us
Daily Top 2Weekly Top 5

Smriti Mandhana Heartbreak! : स्वप्न साकारत असतानाच मोडला डाव; लकीमुळं स्मृती ठरली अनलकी! अन्...

लकी हेमिल्टन हिने अप्रतिम झेल टिपला अन् स्मृती अनलकी ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 23:39 IST

Open in App

महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामात जीवलग मैत्रीण जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध खेळताना टीम इंडियाची क्वीन आणि RCB ची कॅप्टन स्मृती मानधना हिने इतिहास रचला. या स्पर्धेच्या इतिहासात भारताकडून सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा मोठा डाव तिने साधला.  आतापर्यंत जे घडलं नाही ते स्वप्न सत्यात उतरत असताना डाव मोडला. स्मृती मानधना अडखळली अन् WPL च्या इतिहासातील शतकाचं स्वप्न अधुरेच राहिले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सगळं काही सुरळीत सुरु असताना अडखळली स्मृती अन्...

जेमिमा रॉड्रिग्सच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधना हिने तोऱ्यात बॅटिंग केली. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्येचा गुजरात जाएंट्सच्या सोफी डिवाइनचा विक्रमही तिने मोडला. पण स्मृतीचं शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. जर हा डाव तिने साधला असता तर महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात शतक झळकावणारी ती पहिली बॅटर ठरली असती. WPL च्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिने सोफीला मागे टाकले. तिने यूपी वॉरियर्सकडून ९५ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे. स्मृती मानधना हिने तिच्यापेक्षा एक धाव अधिक काढली अन् ती बाद झाली. 

Shafali Verma Record : 'लेडी सेहवाग'नं इतक्या षटकारांसह रचला विक्रम; असा पराक्रम करणारी ठरली पहिली

 नंदीनी शर्माच्या गोलंदाजीवर फसली स्मृती!

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना शेफाली वर्माच्या ६२ (२७) अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकात सर्वबाद १६६ धावा करत आरसीबीच्या संघासमोर १६७ धावांचे टार्गेट दिले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीला १४ धावांवर पहिला धक्का बसला. ग्रेस हॅरिस फक्त एका धावेची भर घालून माघारी फिरली. ती परतल्यावर स्मृती आणि जॉर्जिया जोडी जमली. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ चेंडूत १४२ धावांची भागीदारी रचली. स्मृती मानधना ९६ धावांवर खेळत असताना नंदीनी शर्माच्या गोलंदाजीवर फसली. लकी हेमिल्टन हिने अप्रतिम झेल टिपला अन् स्मृती अनलकी ठरली. RCB नं सामना जिंकला, पण स्मृतीवर नर्व्हस नाइंटीची नामुष्की ओढावली. WPL च्या इतिहासात नव्वदीच्या घरात येऊन अडखळणारी ती पाचवी बॅटर ठरली.

 नव्वदीच्या घरात पोहचलेल्या बॅटरचा रेकॉर्ड   

  • ९९* – जॉर्जिया वोल (UP वॉरियर्स महिला) विरुद्ध RCB महिला, लखनौ, २०२५
  • ९९ – सोफी डिव्हाइन (RCB महिला) विरुद्ध गुजरात जायंट्स महिला, ब्राबॉर्न स्टेडियम, २०२३
  • ९६* – अ‍ॅलिसा हिली (UP वॉरियर्स महिला) विरुद्ध RCB महिला, ब्राबॉर्न स्टेडियम, २०२३
  • ९६* – बेथ मुनी (गुजरात जायंट्स महिला) विरुद्ध UP वॉरियर्स महिला, लखनौ, २०२५
  • ९६ – स्मृती मानधना (RCB महिला) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला, मुंबई (DY पाटील), २०२६ 
English
हिंदी सारांश
Web Title : Smriti Mandhana misses century in WPL, sets highest Indian score.

Web Summary : Smriti Mandhana narrowly missed a century in the WPL, scoring 96 against Delhi Capitals. She broke the record for the highest individual score by an Indian in the tournament, but fell short of becoming the first centurion. RCB won the match despite her dismissal.
टॅग्स :महिला प्रीमिअर लीगस्मृती मानधनारॉयल चॅलेंजर्स बेंगलोरबीसीसीआय