WPL 2026 Auction Anushka Sharma Most Expensive Uncapped Player : महिला प्रीमियर लीग २०२६ साठी संघ बांधणी करण्यासाठी नवी दिल्लीत पहिल्यांदा WPL मेगा लिलाव प्रक्रिया पार पडली. या मेगा लिलावात भारताची अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्माला सर्वात मोठी बोली लागली. UP वॉरियर्सनं तिला पुन्हा आपल्या संघात घेण्यासाठी ३.२ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मोजली. या बोलीसह ती WPL च्या आतापर्यंतच्या इतिहासातील स्मृती मानधना पाठोपाठ संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकाची महागडी खेळाडू ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मलिक्का सागरनं WPL लिलालावत अनुष्का शर्माच नाव घेतलं अन्....
सोशल मीडियावर दीप्तीची चर्चा रंगत असताना अचानक अनुष्का शर्मा ट्रेंडिगमध्ये आली आहे. WPL च्या मेगा लिलावात मलिक्का सागर हिने अनुष्का शर्माचं नाव घेताच RCB च्या टेबलवरील मंडळीनं लगबगीनं पॅडल उचलत तिला आपल्या संघात घेण्यासाठी डाव खेळला. पण शेवटी आरसीबीच्या पदरी निराशा पडली. अनुष्का शर्माचं नाव आल्यावर नेमकं काय घडलं? RCB च्या पदरी निराशा का आली? सोशल मीडियावर हा मुद्दा का चर्चेचा विषय ठरतोय? जाणून घेऊयात सविस्तर
WPL च्या मेगा लिलावात अनुष्का शर्माचं नाव आणि आरसीबीच्या संघानं तिला घेण्यासाठी दाखवलेला रस हा विषय चर्चेचा विषय ठरतोय. RCB चा चेहरा असणारा विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि WPL लिलावात नाव नोंदणी केलेली युवा भारतीय महिला क्रिकेटर यांच्या नावात साम्य असल्यामुळे मेगा लिलावात एक ट्विस्ट आला अन् या युवा महिला क्रिकेटरसाठी लागलेली बोली सोशल मीडियावर चर्चेत आली.
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
RCB च्या संघाने अनुष्का शर्मावर बोली लावली, पण ती काही हाती नाही लागली, कारण..
युवा महिला क्रिकेटर अनुष्का शर्मा ही मूळची मध्यप्रदेशमधील ग्वालियरची आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये खास छाप सोडली आहे. WPL मेगा लिलावात ती १० लाख या मूळ किंमतीसह सामील झाली होती. RCB च्या संघाने ४० लाखापर्यंत तिच्यावर बोली लावली. पण शेवटी गुजरात जाएंट्सच्या संघाने ४५ लाख बोली लावल्यावर RCB नं हात आखडता घेतला. अनुष्का शर्मा आगामी हंगामात गुजरातकडून खेळताना दिसणार आहे. ती WPL मेगा लिलावातील सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडूही ठरली आहे.