स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यातील लढतीनं महिला प्रीमिअर लीग (WPL) २०२५ च्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात होत आहे. १४ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर सलामीचा सामना रंगणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्मृतीच्या चॅम्पियन संघासमोर स्टार खेळाड़ूंची उणीव भरून काढण्याचे चॅलेंज
स्मृती मानधनाच्या आरसीबीचा संघ गत विजेता असला तरी यावेळी या संघासमोर नवे चॅलेंज असेल. कारण गत चॅम्पियन संघातील अनेक महिला खेळाडू दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात दिसणार नाहीत. या स्टार खेळाडूंची उणीव भरून काढत आपला तोरा कायम ठेवण्याच्या इराद्याने आरसीबीचा संघ मैदानात उतरेल.
या खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
आरसीबीच्या ताफ्यात स्मृती मानधनाशिवाय आणखी काही चेहरे आहेत ते यंदाच्या हंगामात सर्वांचे लक्षवेधून घेताना दिसतील. यात एलिस पेरीसह रिचा घोष आणि श्रेयंका पाटील उदयोन्मुख प्रतिभावंत मुलींचा समावेश आहे. स्टार खेळाडूंची उणीव भरून काढण्याची मोठी जबाबादारी या खेळाडूंना आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल.
गुजरात जाएंट्सच्या ताफ्यात हरलीनसह या महिला खेळाडू वेधून घेतली लक्ष
दुसरीकडे ॲशली गार्डनर (Ashleigh Gardner) नेतृत्वाखालील गुजरात जाएंट्स संघ गत हंगामातील चुका भरून काढत बदल्याच्या भावनेनं मैदानात उतरेल. गत हंगामात या संघाची कामगिरी खूपच सुमार राहिली होती. ८ सामन्यांपैकी फक्त २ सामन्यात त्यांना विजय मिळाला होता. गुणतालिकेत सर्वात तळाला राहण्याची वेळ या संघाव आली होती. विजयांसह गुणतालिकेत तळाशी राहिले. तथापि, संघाने अॅशले गार्डनर आणि फोबी लिचफिल्ड सारख्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे, तसेच काही आशादायक स्थानिक खेळाडू देखील प्रभाव पाडण्यास उत्सुक असतील. बेथ मूनीशिवाय, ॲशली गार्डनर, हरलीन देओल, तनुजा यासारखे खेळाडू सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता बाळगून आहेत.
GG-W विरुद्ध RCB-W हेड-टू-हेड रेकॉर्ड
गुजरात जाएंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन संघ या लीगमध्ये आतापर्यंत चार वेळा समोरासमोर आले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन -दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे सलामीची लढत ही दोन समतुल्य संघांमध्ये आहे. त्यामुळे लीगमधील पहिला सामना तोडीस तोड होईल, अशी अपेक्षा आहे.