WPL 2025 : महिला प्रीमियर लीग २०२५ स्पर्धतील तिसऱ्या हंगामात यूपी वॉरियर्ज विरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा पारा चढल्याचे पाहायला मिळाले. आधी तिने पंचाशी हुज्जत घातली. मग त्यात ढवळाढवळ केल्याचा राग काढत ती सोफी एसलस्टोनच्या अंगावर धावून गेल्याचा सीन पाहायला मिळाला. मैदानातील दोघींच्यातील भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात आता नव्या गोष्टीची भर पडलीये. मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनवर बीसीसीआयने कारवाई केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंचांशी घातली हुज्जत, बीसीसीआयने केली कारवाई
मुंबई इंडियन्सच्या संघानं मॅच जिंकली, पण कॅप्टन हरमनप्रीत कौरला यूपी विरुद्धच्या लढतीत दाखवलेला तोरा महागात पडला आहे. या सामन्यात निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला अखेरच्या षटकात सर्कल बाहेर फक्त ३ खेळाडू ठेवण्याची वेळ आली होती. पंचाच्या या निर्णयाविरोधात हरमनप्रीत कौर हुज्जत घालतान दिसले होते. अंपायरच्या निर्णय मान्य न करता उगाच लांबड लावल्याबद्दल हरमनप्रीत कौरला अचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणात कलम २.८ नुसार, लेवल १ दोषी ठरवण्यात आले आहे. मुंबईच्या कॅप्टननेही आपली चूक मान्य केली आहे. तिला मॅच फीच्या १० टक्के रक्कम दंडात्मक स्वरुपात द्यावी लागणार आहे.
यूपीच्या डावातील अखेरच्या षटकात ड्रामा, पंचासोबत हुज्जत, मग सोफीसोबत पंगा
यूपी वॉरियर्ज विरुद्धच्या डावातील अखेरच्या षटकात चांगलाच ड्रामा रंगला. निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे अखेरच्या षटकात पेनल्टीच्या रुपात मुंबई इंडियन्सला फक्त ३ खेळाडूंच सर्कल बाहेर ठेवण्याची वेळ आली. यावरच हरमनप्रीत पंचासोबत हुज्जत घालताना दिसली. त्यावेळी सोफीनं पंचाना इशारा केल्यामुळे हरमनप्रीत तिच्यावर भडकली. दोघींच्यातील वादाचा मुद्दा चांगलाच गाजला. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्येही अनेकदा हरमनप्रीत कौरला राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आयपीएलमध्ये पुन्हा तिचा तो अंदाज दिसला अन् त्याची तिला शिक्षाही झाली.