Join us

WPL 2024 Auction Live : ऑस्ट्रेलियन फलंदाज फोबी लिचफील्डवर १ कोटींचा पाऊस; गुजरातच्या ताफ्यात सामील

WPL Auction Live : आज मुंबईत महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 15:23 IST

Open in App

wpl auction live updates in marathi :  आयपीएलच्या धरतीवर सुरू झालेली महिला प्रीमिअर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करत आहे. आज मुंबईत महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे. यावेळी एकूण १६५ खेळाडूंनी WPL २०२४ च्या लिलावासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडू आहेत. १६५ क्रिकेटपटूंपैकी १५ खेळाडू सहयोगी देशांचे आहेत, तर कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या ५६ आणि अनकॅप्ड खेळाडू १०९ आहेत. पाच संघांकडे जास्तीत जास्त ३० स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी ९ जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.

ऑस्ट्रेलियन फलंदाज फोबी लिचफील्डला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात चांगलीच लढत झाली. पण, गुजरातच्या फ्रँचायझीने सर्वाधिक पैसे असल्याचा फायदा घेत स्टार खेळाडूला १ कोटींच्या किंमतीत आपल्या ताफ्यात घेतले. २०२४ च्या लिलावात प्रवेश करणारी पहिली  खेळाडू फोबी लिचफील्ड ठरली आहे, जी ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. तिची मूळ किंमत ३० लाख रुपये होती आणि तिला गुजरात जायंट्सने १ कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले. 

दरम्यान, महिला प्रीमिअर लीगच्या लिलावात एकूण १६५ खेळाडू रिंगणात आहेत. १०४ भारतीय खेळाडूंपैकी २१ खेळाडूंची खरेदी होईल, तर ६१ परदेशी खेळाडूंपैकी ९ खेळाडूंना फ्रँचायझी खरेदी करतील. 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगआॅस्ट्रेलिया