Join us  

World Test Championship 2021-23 Final : टीम इंडिया कसोटी वर्ल्ड कपची फायनल कशी गाठणार?; रोहित शर्माने सांगितलं गणित, लॉर्ड्सवर मारणार धडक

World Test Championship 2021-23 Final : भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेवर २-० असा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 4:31 PM

Open in App

World Test Championship 2021-23 Final : भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेवर २-० असा विजय मिळवला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वातील उपविजेता भारत यंदाही अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे, असा विश्वास कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma) वाटतोय. त्यासाठी रोहितने प्लानही तयार केला आहे आणि लॉर्ड्सवरील या फायनलमध्ये टीम इंडिया धडक देईल असं त्याला वाटतेय. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ( १-२) पराभवानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर श्रीलंकेवर सहज विजय मिळवला. ३४ वर्षीय रोहित म्हणाला,'WTC च्या फायनलमध्ये धडक मारणे हे आमचे लक्ष्य आहे, परंतु खरं सांगायचं तर आम्ही इतक्या दूरचा विचार करत नाही. आम्हाला वर्तमानाचा विचार करून WTC Finalच्या दिशेने जाण्यासाठी योग्या पाऊल टाकायला हवं. त्यामुळे हे लहान लहान लक्ष्यही महत्त्वाचे आहेत.'' 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा फटका संघाला बसला आहे, परंतु संघाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचेही रोहितने मान्य केले. ''दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्याचा मोठा फटका बसला आहे आणि त्यामुळे महत्त्वाचे गुणही गमावले आहेत. WTC गुणतालिकेचा विचार कररता अजूनही बरेच गुण कमवायचे आहेत, परंतु संघ म्हणून आमची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे,''असेही रोहित म्हणाला.   

WTC 2021-23 गुणतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?भारतीय संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने सहा विजय मिळवले असून तीन अनिर्णीत निकाल आणि दोन पराभव पत्करले आहेत. भारताची जय-परायजाची टक्केवारी ही ५८.३३ इतकी आहे. ऑस्ट्रेलिया ( ७७.७७), पाकिस्तान ( ६६.६६) आणि दक्षिण आफ्रिका ( ६०.००) हे भारताच्या पुढे आहेत.  

WTC मध्ये भारताचे पुढील सामनेभारताचे आता एकूण  ७ सामने शिल्लक आहेत. १ जुलैला भारत बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध स्थगित झालेली कसोटी खेळणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे.  

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धारोहित शर्माभारतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत विरुद्ध बांगलादेश
Open in App