IND vs PAK Match Toss Controversy Fatima Sana and Harmanpreet Kaur : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात टॉस वेळी पुन्हा एकदा 'नो हँडशेक' चित्र पाहायला मिळाले. याशिवाय महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामन्यात टॉस वेळी एक मोठी चूक झाल्याचे दिसून आले. नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूनं लागला. पण पाकिस्तानने टॉसचा विजेता ठरवण्यात आले. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत-पाक यांच्यातील मॅच आधी टॉस वेळी मोठी चूकच नेमकं काय घडलं?
भारत-पाक यांच्यातील सामन्यासाठी टॉस वेळी हरमनप्रीत कौरने नाणे हवेत उंचावले. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने 'टेल्स' अर्थात काटा असा कॉल दिला. ऑस्ट्रेलियाची प्रेझेंटर मेल जोन्स यांनी याउलट पाकिस्तान कर्णधाराने 'हेड्स' छापा असा कॉल केल्याचे म्हटले. कहर म्हणजे आयसीसी मॅच रेफरी शँड्रे फ्रिट्झ यांनी प्रेझेंटरच्या सूरात सूर मिसळत टॉसचा निकाल पाकिस्तानच्या बाजूने लागल्याचे जाहीर केले. पाकिस्तानी कॅप्टन फातिमा सनाला आपण काय मागितलं ते लक्षात नव्हतं का? हरमप्रीतच्याही ही गोष्ट लक्षात न आल्याचा फायदा घेत तिनं टॉसची क्वीन होण्यासाठी चिटिंग केली का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितीत होत आहेत.
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
टॉसनंतर काय म्हणाली फातिमा सना?
खेळपट्टीवर ओलावा असल्यामुळे पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत. आम्ही आत्मविश्वासाने मैदानात उतरत भारतीय संघाला २५० पेक्षा कमी धावांत रोखण्याचा प्रयत्नशील आहोत. जर ते शक्य झालं तर आम्ही धावांचा यशस्वी पाठलाग करू शकतो.
एका बदलासह मैदानात उतरली टीम इंडिया, हरमनप्रीत कौरनं सांगितलं त्यामागंच कारण
वर्ल्ड कप स्पर्धेआधी आम्ही इथं एक चांगली मालिका खेळलीये. सकारात्मकतेसह सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अमनजोत आजारी असल्यामुळे तिच्या जागी रेणुका सिंह ठाकूरसह मैदानात उतरत आहोत, ही गोष्टही हरमनप्रीत कौरनं बोलून दाखवली. भारताने या स्पर्धेची मोहिम श्रीलंकेवर ५९ धावांनी विजय मिळवत केली होती. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.