Join us  

Women's T20 World Cup: सलामी फलंदाजाला दुखापत; पहिल्या विजयानंतरही भारताचं वाढलं टेन्शन

आयसीसी महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी- 20 विश्वचषकाचा भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या  सलामीच्या सामन्यात 17 धावांनी विजय मिळवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 6:06 PM

Open in App

आयसीसी महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी- 20 विश्वचषकाचा भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या  सलामीच्या सामन्यात 17 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताने ऑस्ट्रेलिया संघाला 115 धावातच गुंडाळले. भारतासाठी हा विजय आनंददायी असला तरी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघाची सलामी फलंदाज स्मृती मानधनाला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आहे. स्मृती क्षेत्ररक्षण करत असताना सीमाबाहेरील असणाऱ्या बोर्डावर आदळल्याने तिला खांद्याला दुखापत झाली. या सर्व घटनेनंतर फिजिओंनी स्मृतीला मैदानाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही वेळात स्मृती पुन्हा मैदानात उतरली असली तरी दुखापतीचा त्रास जास्त झाल्यास भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान  भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. भारताने चार षटकांमध्ये 41 धावा केल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाची फिरकीपटूने स जोनासेनने भारताची सलामी फलंदाज स्मृती मानधना 10 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. 

आपला पहिला ट्वेंटी- 20 विश्वचषक सामना खेळणारी शफाली वर्मा फटकेबाजीच्या प्रयत्नात माघारी परतली. तिने धमाकेदार खेळी करत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला, पण 15 चेंडूत 29 धावा करून ती बाद झाली. ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडला शफालीला झेलबाद करण्यात यश आले.

भारताची अनुभवी कर्णधार हरमनप्रीत कौर देखील फक्त 2 धावा करत यष्टीचीत झाली. यानंतर दिप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जेमिमाला डेलिसा किमिन्सेने पायचीत केले. जेमिमाने 33 चेंडूत 26 धावा केल्या. त्यामुळे दीप्ती शर्मा आणि जेमिमाच्या धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे आव्हान दिले होते. 

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती. मात्र भारताची गोलंदाज पूनम यादवच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला. ऑस्ट्रेलियाची विकेटकीपर अ‍ॅलिसा हेली सर्वाधिक 51 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची फलंदाज अ‍ॅश्ले गार्डनर शेवटपर्यत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिखा पांडेने तिला झेलबाद करत विजयाचा मार्ग मोकळा केला. अ‍ॅश्ले गार्डनरने 36 चेंडूत 34 धावा केल्या. भारतीय संघाची गोलंदाज पूनम यादवने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर शिखा पांडेला दोन विकेट्स आणि राजेश्र्वरी गायकवाडला एक विकेट्स घेण्यात यश मिळाले आहे.

टॅग्स :विश्वचषक ट्वेन्टी-२०भारतआॅस्ट्रेलियाबीसीसीआयआयसीसी