Join us

Women's T20 World Cup, India vs. Aus Live: भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

आयसीसी महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी- 20 विश्वचषकाचा सलामीच्या भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 16:43 IST

Open in App

सिडनी: आयसीसी महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी- 20 विश्वचषकाचा भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या  सलामीच्या सामन्यात 17 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे आव्हान दिले होते.

Live अपडेट-(Australia Women vs India Women)

भारताने ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी पराभूत केले आहे.

ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूत २७ धावा हव्या आहेत.

ऑस्ट्रेलियाला सातवी विकेट्स गमावली आहे. 

ऑस्ट्रेलियाने 15 षटकात 91 धावा करत सहा विकेट्स गमावल्या आहे.

भारताची गोलंदाज पूनम यादवने कमालीची गोलंदाजी करत 3 षटकात 15 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आहे.

ऑस्ट्रेलियाने 13.4 षटकात 82 धावा करत सहा विकेट्स गमावल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने 76 धावांवर चौथी विकेट गमावली आहे. रॅचेल हेन्सला पूनम यादव यष्टचीत करत बाद केले आहे.

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, विकेटकीपर अ‍ॅलिसा हेली बाद झाली आहे. अ‍ॅलिसाने 51 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगला राजे राजेश्वरी गायकवाडने बाद केले आहे.

ऑस्ट्रेलियाने 8 षटकात एक विकेट गमावत 51 धावा केल्या आहे.

ऑस्ट्रेलियाची सलामी फलंदाज बेथ मुनीला शिखा पांडेने बाद केले आहे. आता ऑस्ट्रेलिया 1 बाद 32

भारताची सलामी फलंदाज स्मृती मानधनाला क्षेत्ररक्षण करत असताना दुखापत झाली आहे. 

- ऑस्ट्रेलियाने 5 षटकात एकही विकेट न गमावता 30 धावा केल्या आहेत.

- ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरूवात झाली असून 4 षटकात ऑस्ट्रेलियाने 26  धावा केल्या आहेत.

 

 

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेटभारतआॅस्ट्रेलिया