Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs ENG : हो, संजू चुकला! पण सेमीफायनल आधी बंदीची कारवाई होईल ही अफवाच; कारण...

यंदाच्या हंगामात हेल्मेट फेकल्यामुळे कोणत्या खेळाडूवर काय कारवाई झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 18:46 IST

Open in App

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातील धमाकेदार कामगिरीनंतर संजू सॅमसनवर ICC कडून कारवाई होऊ शकते, अशी चर्चा रंगताना दिसत आहे. मैदानात हेल्मेट फेकल्यामुळे खरंच त्याच्यावर बंदीची  कारवाई होईल का? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. संजू सॅमसन याचे मैदानातील कृत्य हे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाऊ शकते. इथपर्यंतची चर्चा ठिक आहे. पण थेट सेमीफायनल आधी टीम इंडियाची अडचण वाढणार? संजू सॅमसनवर बंदीची कारवाई होणार? यासारख्या चर्चा म्हणजे एक प्रकारे अफवा पसरणे आहे.  थेट त्याच्यावर बंदीची कारवाई होईल, असा अंदाज बांधणे चुकीचे आहे. त्यासाठी आयसीसीचा नियम समजून घेण्यासोबतच यंदाच्या हंगामात असे कृत्य करणाऱ्या खेळाडूवर नेमकी काय कारवाई झाली ते पाहणे गरजेचे आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हेल्मेट फेकणं चुकीचे आहे का? ICC चा नियम काय सांगतो?

कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात विक्रमी १९६ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन याने नाबाद ९७ धावांची खेळी केली. खणखणीत चौकार मारून संघाच्या विजयावर  शिक्कामोर्तब केल्यावर संजू सॅमसन याने हेल्मेट काढून जमिनीवर फेकल्याचे पाहायला मिळाले. आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम २.२ नुसार, हेल्मेट, बॅट किंवा स्टम्प यांसारखी क्रिकेट उपकरणे फेकणे किंवा त्याला नुकसान पोहचवणे क्रिकेट  उपकरणांचा गैरवापर मानला जातो. हेतू काहीही असला तरी असा प्रकार  आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल-१ गुन्हा प्रकारात मोडतो. 

एक झलक, सबसे अलग! धोनीचा सरावादरम्यानचा 'तो' व्हिडीओ का होतोय इतका व्हायरल?

काय कारवाई होऊ शकते?

पहिला मुद्दा हा की, ICC नं यासंदर्भात अद्यापही आपली कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मैदानातील पंच आणि रेफ्रींनी तक्रार केली तरच हे प्रकरण पुढे जाते. संजू सॅमसन या प्रकरणात रडारवर असला आणि आयसीसीने त्याच्यावर शिस्त भंगाची कारवाई झाली तरी सामना फीच्या ५० टक्के कपातीसह डिमेरिट गुण अशा स्वरुपाच्या पलिकडे त्याच्यावर बंदीची कारवाई होऊ शकत नाही. कारण सेलिब्रेशनच्या वेळी संजू सॅमसनकडून जी चूक झाली ती बंदी घालण्या इतकी गंभीर नाही, हे लक्षात घेणं गरजेचे आहे. या गोष्टीला आधार हा की, यंदाच्या हंगामातच स्कॉटलंडच्या खेळाडूवर हेल्मेट फेकल्याच्या गोष्टीवरून कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्याच्यावर झालेल्या कारवाईवरून संजूसंदर्भात कोणत्या प्रकारची कारवाई होऊ शकते शकते याचा अंदाज बांधता येऊ शकतो. 

यंदाच्या हंगामात हेल्मेट फेकल्यामुळे कोणत्या खेळाडूवर काय कारवाई झाली?

यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी सामन्यात स्कॉटलंडच्या जॉर्ज मन्सी याने विकेट गमावल्यावर ड्रेसिंग रुमकडे जाताना रागाने आपले हेल्मेट जाहिरातीच्या फलकावर फेकले होते. असभ्य वर्तनाबद्दल त्याला ICC ने त्याच्यावर खात्यात १ डिमेरिट गुण जमा केला होता. एखाद्या खेळाडूच्या खात्यात २४ महिन्यांच्या आत ४ डिमेरिट गुण जमा झाले तर त्याच्यावर बंदीची कारवाई होते. त्यामुळे हे उदाहरण पाहिले तर संजूच्या प्रकरणात यापलिकडे बंदीचा प्रश्नच उद्भवणार नाही.   

English
हिंदी सारांश
Web Title : Sanju Samson's Helmet Throw: Ban Unlikely Before Semifinal, Here's Why

Web Summary : Following a helmet-throwing incident, speculations arose about a ban on Sanju Samson. While the act violates ICC's code, a ban before the semifinal is unlikely. Similar incidents resulted in fines and demerit points, not bans. Official confirmation from ICC is awaited.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध इंग्लंडभारत विरुद्ध वेस्ट इंडिजसंजू सॅमसनभारतीय क्रिकेट संघ