Join us

Big News : पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळण्यासाठी येणार, आयसीसीनं उचललं मोठं पाऊल

भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. टशन, थरार, वाद असा पूर्ण पॅकेज उभय देशांच्या सामन्यातून अनुभवायला मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 12:40 IST

Open in App

भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. टशन, थरार, वाद असा पूर्ण पॅकेज उभय देशांच्या सामन्यातून अनुभवायला मिळतो. पण, दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थिती पाहता भारत-पाकिस्तान फक्त ICC आणि आशिया चषक स्पर्धेतच एकमेकांविरुद्ध खेळतात. २००७म्ये पाकिस्तानचा संघ पाच वन डे व तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यानंतर २०१२-१३मध्ये भारत दौऱ्यावर पाकिस्तान मर्यादित षटकांची द्विदेशीय मालिका खेळला होता. Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट; काही दिवसांपूर्वी झाला होता कोरोना

पाकिस्तान संघाचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा भारतीय भूमीत क्रिकेटचा थरार रंगण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतात यंदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे ( T20 World Cup is scheduled to be played in India later this year) आणि त्यासंदर्भात पाकिस्तानच्या सहभागावरून उडालेल्या गोंधळावर आयसीसीनं मोठं पाऊल उचललं आहे.  ऑक्टोबर महिन्यात हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे आणि यासाठी पाकिस्तानच्या खेळाडू व सपोर्ट स्टाफला व्हिसा मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही BCCIनं आयसीसीला दिली आहे.  IPL 2021 : महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो यांच्यासाठी सुरेश रैनानं डोळ्यावर पट्टी बांधून बनवलं जेवण, पत्नीनं दिला सल्ला!

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे चेअरमन एहसान मणी यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी खेळाडू व सपोर्ट स्टाफला व्हिसा मिळण्याची ग्वाही देण्यात यावी अशी विनंती आयसीसीकडे केली होती. ''भारतानं आम्हाला व्हिसाबाबत लेखी आश्वासन द्यावं अन्यथा वर्ल्ड कप भारतातून यूएईत खेळवण्यात यावा,''असे मत मणी यांनी व्यक्त केलं होतं.  शाहरुख खानच्या KKR संघाला मोठा दिलासा; १९ मार्चला निगेटिव्ह, २२ मार्चला पॉझिटिव्ह अन् आता प्रमुख खेळाडू कोरोनामुक्त

पाकिस्तान क्रिकेट संघाला २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी व्हिसा देण्यात आला होता. त्यानंतर ते भारतात आलेले नाहीत. २०२१चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये खेळवण्यात येणार आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसी विश्वचषक टी-२०आयसीसीबीसीसीआय