IPL 2021 : महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो यांच्यासाठी सुरेश रैनानं डोळ्यावर पट्टी बांधून बनवलं जेवण, पत्नीनं दिला सल्ला!

Indian Premier League ( IPL 2021) च्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यासह सर्व संघ सरावासोबतच विविध जाहीरातींसाठी शूट करताना दिसत आहेत.

यंदाच्या आयपीएलमध्ये फ्रँचायझींना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार नाही. CSK चे पाच सामने मुंबईत होणार आहेत आणि त्यानंतरचे तीन सामने दिल्लीत होतील.

महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, रॉबीन उथप्पा आणि सॅम कुरन ( MS Dhoni, Suresh Raina, Dwayne Bravo, Robin Uthappa, Sam Curran) यांच्यासह CSKच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेला चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) हाही नेट्समध्ये फटकेबाजी करताना दिसला.

गुरुवारी सुरेश रैनानं इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आणि त्यात तो डोळ्यावर पट्टी बांधून धोनी व ब्राव्हो यांच्यासाठी जेवण बनवताना दिसत आहे. ''धोनी व ब्राव्हो हे आज माझे कूकींग पार्टनर आहेत, आम्ही काय बनवतोय, अंदाज लावा,''असे रैनानं लिहिले.

रैनानं पोस्ट केलेल्या या फोटोवर त्याची पत्नी प्रियांका हिनं मजेशीर कमेंट केली. तिनं लिहिलं की, स्वतःचं बोट कापून घेऊ नकोस.

मागच्यावर्षी यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) होता. संघातील प्रमुख खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) यूएईतून मायदेशात परतला, त्यानंतर त्याच्या आणि धोनीच्या वादाच्या चर्चाही रंगल्या. अशात रैना CSKच्या ताफ्यात दिसेल की नाही, यावरही बरेच तर्क लावले गेले. पण, अखेर सुरेश रैना चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला.

धोनी आणि रैना या दोघांनी एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २००८ पासून हे दोघेही CSKचे सदस्य आहेत. CSKवर दोन वर्षांची बंदी झाली तेव्हा हे दोघं वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळले होते. चेन्नईकडून सुरेश रैनानं सर्वाधिक ४५२७ धावा केल्या आहेत, तर धोनीच्या नावावर ४०५८ धावा आहेत.