Join us

Wicket Celebration Video: भन्नाट स्टाईल! विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाने केलं स्पेशल सेलिब्रेशन

तुम्हाला पाहिलीत का त्या क्रिकेटरची अफलातून 'स्टाईल'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 20:10 IST

Open in App

Wicket Celebration Video: क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंची वेगवेगळी सेलिब्रेशन स्टाईल पाहायला मिळते. काही जण उत्साहात ओरडाआरडा करतात, तर कोणी आनंदाने नाचताना दिसतात. याच दरम्यान आता एका नव्या आणि वेगळ्याच सेलिब्रेशन स्टाईलने साऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. क्रिकेट चाहत्यांना ही स्टाईल खूपच पसंतीस उतरल्याचेही चिन्ह आहे. विशेष म्हणजे, क्रिकेट साठी फारसा प्रसिद्ध नसलेल्या सर्बिया च्या क्रिकेटपटूने ( ayo mene ejegi ) विकेट घेतल्यानंतर असा आनंद साजरा केला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ फारच व्हायरल झाला आहे.

ICC T20 विश्वचषकाच्या डिव्हिजनल पात्रता फेरीच्या सामन्यात सर्बिया आणि isle of Man हे दोन संघ आमनेसामने होते. या सामन्या दरम्यान जेव्हा सर्बियाच्या अयो मेने-एजेगीने विकेट घेतली तेव्हा त्याने शानदार सेलिब्रेशन केले. विकेट घेताच तो जमिनीवर पडला. त्यानंतर तो तिथेच पडून राहिला. तो पडून राहिलेला असताना खेळाडूंनी येऊन त्याला हाय-फाइव्ह केले. अयो मेने-एजेगीने प्रत्येक विकेटनंतर असेच सेलिब्रेशन केले. पाहा व्हिडीओ-

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून तो व्हायरल झाला आहे. ट्विटरवरही अनेक युजर्सनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. ३१ वर्षीय अयो मेने-एजेगीने सर्बियासाठी ११ टी२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ११ बळी आहेत. त्याने नुकतेच ३० धावांत ४ बळी घेतले. ही त्याची टी२० मधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाआयसीसी
Open in App