Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन् ट्रॅविस हेडनं कॅरेबियन गोलंदाजासमोर टेकले गुडघे (VIDEO)

कॅरेेबिनय गोलंदाजाने घेतलेली ही विकेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 01:38 IST

Open in App

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमधील ब्रिजटाउनच्या केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्या दोन दिवसांच्या खेळात गोलंदाजांसाठी अनुकूल ठरलेल्या खेळपट्टीवर  ट्रॅविस हेड याने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर संघ अडचणीत असताना कॅरेबियन गोलंदाजांसमोर तो तोऱ्यात खेळला. पण  संघाला दिलासा देणारी खेळी केली. पण शामर जोसेफ याने त्याला शेवटी गुडघे टेकायला भाग पाडले. कॅरेेबिनय गोलंदाजाने घेतलेली त्याची विकेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

..अन् सेट झालेला ट्रॅविस हेड चारीमुंड्याचित

एका बाजूला अन्य फलंदाज धावांसाठी संघर्ष करत असताना ट्रॅविस हेड अगदी रुबाबात खेळता होता. सेट झाल्यावर तो कोणत्याही संघासमोर अधिक घातक ठरतो. पण शामर जोसेफ याने अप्रतिम चेंडूवर त्याला चारीमुंड्या चित केल्याचे पाहायला मिळाले. शामर जोसेफ अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू इनस्विंग झाला अन् ऑस्ट्रेलियन फलंदाजाला काही कळायच्या आत पॅडवर आदळला. गोलंदाजाने अपील केल्यावर पंचांनी बोट वर केल्यावर हेडनं DRS चा विचारही न करता निराश होत मैदान सोडले.

वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीसमोर फिकी ठरली फ्लिंटॉफच्या लेकाची फिफ्टी! युवा टीम इंडियाची विजयी सलामी

ऑस्ट्रेलियानं यजमान कॅरेबियन संघासमोर सेट केलं ३०१ धावांचे टार्गेट

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ट्रॅविस हेड हा दोन्ही संघाकडून एकमेव असा बॅटर होता ज्याने ५९ धावांच्या खेळीसह अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावातही त्याने संघ अडचणीत असताना ९५ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. ट्रॅविस हेडशिवाय वेबस्टर ६३ (१२०) आणि एलेक्स कॅरी ६५ (७५) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात ३१० धावा केल्या.  यजमान वेस्ट इंडिजला हा सामना जिंकण्यासाठी ३०१ धावांचे टार्गेट मिळाले आहे. पहिल्या डावात चार विकेट्स घेणाऱ्या  जोसेफनं दुसऱ्या डावात पंजा मारला. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धावेस्ट इंडिजआॅस्ट्रेलिया