WI vs AUS 1st Test :जोश हेजलवूडचा 'पंजा'; एका सत्रात १० विकेट्स! तिसऱ्या दिवशीच यजमानांचा खेळ खल्लास!

जोश हेजलवूडच्या भेदक माऱ्यासमोर कॅरेबियन बॅटर्संनी अक्षरश: नांगी टाकली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:28 IST2025-06-28T11:21:51+5:302025-06-28T11:28:51+5:30

whatsapp join usJoin us
WI vs AUS 1st Test Josh Hazlewood Wreaked Havoc West Indies Lost 10 Wickets In One Session | WI vs AUS 1st Test :जोश हेजलवूडचा 'पंजा'; एका सत्रात १० विकेट्स! तिसऱ्या दिवशीच यजमानांचा खेळ खल्लास!

WI vs AUS 1st Test :जोश हेजलवूडचा 'पंजा'; एका सत्रात १० विकेट्स! तिसऱ्या दिवशीच यजमानांचा खेळ खल्लास!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WI vs AUS 1st Test : पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध दौऱ्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात ही धमाकेदार विजयासह केलीये. दुसऱ्या डावात ३१० धावा करून ऑस्ट्रेलियन संघाने यजमान वेस्ट इंडिज संघासमोर ३०१ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १४१ धावांत ऑल आउट झाला. कहर म्हणजे दुसऱ्या डावात वेस्टइंडिजचा संघाने एका सत्रात सर्वच्या सर्व १० विकेट्स गमावल्या. जोश हेजलवूडच्या भेदक माऱ्यासमोर कॅरेबियन बॅटर्संनी अक्षरश: नांगी टाकली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

जोश हेजलवूडचा 'पंजा' 

बार्बाडोसमधील ब्रिजटाउन येथील केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात जोश हेजलवूडनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाच विकेट्सचा डाव साधला. कसोटी कारकिर्दीत १३ व्या वेळी त्याने हा पराक्रम करून दाखवलाय. त्याच्याशिवाय अखेरच्या षटकात लायन याने २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. 

...अन् ट्रॅविस हेडनं कॅरेबियन गोलंदाजासमोर टेकले गुडघे (VIDEO)

चांगली  सुरुवात केल्यावर ९ धावांत ४ विकेट्स

ऑस्ट्रेलियन संघाने ८२ धावांच्या आघाडीसह तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती.  ट्रॅविस हेड, ब्यू वेबस्टर आणि एलेक्स कॅरी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात ३१० धावा करत वस्ट इंडिजच्या संघासमोर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पहिल्या दोन दिवसातील खेळात २४ विकेट्स पडल्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघासमोर ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान सहाजिकच मोठे होते. यजमान संघाने धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. धावफलकावर १ बाद  ४७ अशी धावसंख्या असताना कॅरेबियन संग  कांगारुंना टक्कर देईल, असे चित्र निर्माण झाले होते. पण हे चित्र क्षणात पालटलं. वेस्ट इंडिजच्या संघाने ९ धावांत ४ विकेट्स गमावल्या अन् सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं फिरला. 

...अन् ऑस्ट्रेलियानं घेतला बदला

अवघ्या ५६ धावांवर वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतला होता. ठराविक अंतराने विकेट गमावत शंभरीच्या आत संघाने ८ विकेट्स गमावल्या. लायननं अखेरच्या षटकात दोन विकेट्स घेतल्या अन्  एका सत्रात १० विकेट्स देत वेस्ट इंडिजच्या संघावर लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की ओढावली. गत वर्षी गाबाच्या मैदानात वेस्ट इंडिजच्या संघाने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानात शह दिला होता. पहिल्या कसोटी सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियानं बदला घेतला आहे.
 

Web Title: WI vs AUS 1st Test Josh Hazlewood Wreaked Havoc West Indies Lost 10 Wickets In One Session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.