IPL 2025 : हार्दिक पांड्यावर बंदी! CSK विरुद्ध MI च्या ताफ्यातील कुणाला मिळणार कॅप्टन्सीची संधी?

जाणून घ्या हार्दिक पांड्यावर कॅप्टन असून बाकावर बसण्याची वेळ येण्यामागचं कारण, अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 11:21 IST2025-02-17T10:52:57+5:302025-02-17T11:21:43+5:30

whatsapp join usJoin us
Why Will Hardik Pandya Banned From Playing Mumbai Indians Opening Game Against Chennai Super Kings In IPL 2025 Reason Revealed 3 Captaincy Options Rohit Sharma Suryakumar Yadav | IPL 2025 : हार्दिक पांड्यावर बंदी! CSK विरुद्ध MI च्या ताफ्यातील कुणाला मिळणार कॅप्टन्सीची संधी?

IPL 2025 : हार्दिक पांड्यावर बंदी! CSK विरुद्ध MI च्या ताफ्यातील कुणाला मिळणार कॅप्टन्सीची संधी?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI 3 Captaincy Options For Hardik Pandya Banned : बीसीसीआयनं रविवार (१६ फेब्रुवारी) रोजी आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामाची सुरुवात ही चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या लढतीनं करेल. २३ मार्चला चेपॉकच्या मैदानात आयपीएलमधील दोन लोकप्रिय संघातील रंगत पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या इतिहासात या दोन संघात कांटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. या दोन्ही संघातील आयपीएलमधील लढत ही नेहमीच 'हायहोल्टेज' सीन दाखवणारी ठरली आहे. त्यामुळे प्रत्येक क्रिकेट चाहता पुन्हा एकदा या दोन्ही संघातील सामन्याचा आनंद घेण्यासाठी आतूर असेल. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

नियमित कॅप्टन हार्दिक पांड्याला बसावे लागणार बाकावर

या ओपनिंग लढती आधीच मुंबई इंडियन्सच्या ताफ्याला मोठा धक्का बसला आहे. कारण MI फ्रँचायझी संघाचा कॅप्टन हार्दिक पांड्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. गत हंगामात झालेल्या तीन चुकांमुळे हार्दिक पांड्याला नव्या हंगामातील पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे. याचा अर्थ चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्सच्या संघाला नियमित कॅप्टनच्या अनुपस्थितीत कार्यवाहू कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरावे लागेल.    

काय आहे प्रकरण ज्याची हार्दिक पांड्याला मोजावी लागणार किंमत?

मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघानं कॅप्टन्सीच्या रुपात हार्दिक पांड्यालाच कायम ठेवले आहे. गत हंगामात पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना संघाकडून तीन चुका झाल्या. ज्याची किंमत नव्या हंगामात कॅप्टनला मोजावी लागणार आहे. आयपीएलच्या नियमानुसार, एखाद्या संघानं हंगामात तीन सामन्यात वेळेत निर्धारित षटके पूर्ण केली नाहीत (स्लो ओव्हर रेट) तर या सीनमध्ये कॅप्टनवर दंडात्मक कारवाई आणि एका मॅचची बंदी अशी शिक्षा आहे. मुंबई इंडियन्सने गत हंगामात तीन वेळा टाइमपास केल्याचे पाहायला मिळाले. परिणामी चेन्नई विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याशिवायच संघाला मैदानात उतरावे लागेल. 

हार्दिकच्या जागी कॅप्टन्सीसाठी 'एक से बढकर एक' पर्याय

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात कॅप्टन्सीसाठी एक से एक पर्याय आहेत. पाच वेळा संघाला जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्मासह आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणारा सूर्यकुमार यादवही मुंबईच्या ताफ्यात आहे. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाची कॅप्टन्सी केलेला जसप्रीत बुमराह देखीलल याच ताफ्यात आहे.  हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत या तिघांपैकी एकजण मुंबई इंडियन्सच्या संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. यात पहिली पसंतीही रोहित शर्माच असेल. फायनली टॉससाठी मैदानात कोण उतरणार ते पाहण्याजोगे असेल. 

Web Title: Why Will Hardik Pandya Banned From Playing Mumbai Indians Opening Game Against Chennai Super Kings In IPL 2025 Reason Revealed 3 Captaincy Options Rohit Sharma Suryakumar Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.