टीम इंडिया श्रेयस अय्यरला प्लेइंग ११ मध्ये संधी का देत नाही? अखेर खरं कारण आलं समोर

Shreays Iyer Team India Playing XI: चौथ्या टी२० मध्ये श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:24 IST2026-01-29T15:22:56+5:302026-01-29T15:24:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
why Team India not giving Shreyas Iyer a chance in the playing 11 Finally the real reason has come to light IND vs NZ 4th T20 | टीम इंडिया श्रेयस अय्यरला प्लेइंग ११ मध्ये संधी का देत नाही? अखेर खरं कारण आलं समोर

टीम इंडिया श्रेयस अय्यरला प्लेइंग ११ मध्ये संधी का देत नाही? अखेर खरं कारण आलं समोर

Shreays Iyer Team India Playing XI: ईशान किशन अनफिट असूनही टीम इंडियाने श्रेयस अय्यरला चौथ्या टी२० मध्ये संधी दिली नाही. या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोशल मीडियापासून ते क्रिकेट तज्ज्ञांपर्यंत सर्वांनाच आश्चर्य वाटले की अय्यरला संधी का दिली गेली नाही. जर श्रेयस अय्यरला मैदानात उतरवण्यात येणार नसेल, तर त्याला टी२० संघात का समाविष्ट करण्यात आले आहे, असाही सवाल विचारला जात आहे. प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा म्हणाला की जर श्रेयस अय्यरला संधी दिली जाणार नसेल, तर त्याला एखादा युवा खेळाडू संघात घ्यायला हवा. याचदरम्यान, आता श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळण्याचे एक मोठे कारण समोर येत आहे.

श्रेयस अय्यरला मैदानात न उतरवण्याचे सर्वात मोठे कारण

श्रेयस अय्यरला मैदानात उतरवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची टी२० संघातील अनुपस्थिती. अय्यर टी२० विश्वचषक संघाचा भाग नसल्याने त्याचा विचार केला जात नाहीये. सध्या संघ व्यवस्थापन अशा खेळाडूंना संधी देत आहे, जी टी२० विश्वचषकासाठी आधीच संघात आहेत किंवा स्टँडबाय खेळाडू म्हणून त्यांना संधी आहे. अय्यरचा टी२० विश्वचषकात सहभाग असण्याची शक्यता कमी आहे. कारण तिलक वर्मा पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि संघाकडे त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर आधीच एक खेळाडू आहे.

टी२० विश्वचषकाच्या खेळाडूंना संधी व वेळ देणे महत्त्वाचे

टीम इंडिया टी२० विश्वचषक संघासाठी निवडलेल्या खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याचा वेळ देऊ इच्छिते. उदाहरणार्थ, विशाखापट्टणम टी२०मध्ये भारतीय संघाने इशान किशनच्या जागी अर्शदीप सिंगला मैदानात उतरवले. संघाने एक फलंदाज कमी केला, परंतु येथे इतर फलंदाजांवर अधिक दबाव आणणे आणि त्यांना खेळण्यासाठी अधिक वेळ देणे हा विचार होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ गोलंदाजीत अपयशी ठरले होते. त्यामुळे असा निर्णय घेतला गेला होता.

टीम इंडियाचा पराभव

पहिले तीन टी२० सामने जिंकल्यानंतर, टीम इंडियाने चौथा सामना गमावला. २१६ धावांचे लक्ष्य ठेवून भारतीय संघ १६५ धावांवर गारद झाला. अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादवही लवकर बाद झाला. हार्दिक पांड्या फक्त दोन धावा करू शकला. शिवम दुबेने २३ चेंडूत ६५ धावा करून चाहत्यांची मने जिंकली, पण तो सामना जिंकवू शकला नाही. टॉप ऑर्डरच्या अपयशानंतर, मधल्या फळीतील फलंदाजांची हाराकिरी यामुळे टीम इंडियासमोर मोठी समस्या निर्माण केली.

Web Title : टीम इंडिया श्रेयस अय्यर को प्लेइंग XI में क्यों नहीं खिला रही? कारण सामने आया

Web Summary : श्रेयस अय्यर को टी20 विश्व कप टीम में शामिल नहीं किए जाने के कारण उन्हें प्लेइंग इलेवन में शामिल नहीं किया जा रहा है। टीम इंडिया विश्व कप की योजनाओं में शामिल खिलाड़ियों को तैयार करने के लिए उन्हें अवसर देना पसंद करती है। पहले तीन मैच जीतने के बाद भारत चौथा टी20 हार गया।

Web Title : Why isn't Shreyas Iyer in India's Playing XI? Reason Revealed

Web Summary : Shreyas Iyer's absence from the T20 World Cup squad is the main reason for not including him in the playing XI. Team India prefers giving opportunities to players already in the World Cup plans to prepare them. India lost the fourth T20 after winning the first three matches.