Join us

Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

चेन्नई कसोटी सामन्यात बॅटिंग करतावेळी शाकिबनं आपल्या एका वेगळ्या कृतीमुळे लक्षवेधून घेतलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 17:53 IST

Open in App

चेन्नई कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी बांगलादेश संघाचा पहिला डाव १४९ धावांत आटोपला. पाकिस्तान दौऱ्यावरील शेर भारतीय गोलंदाजीसमोर ढेर झाल्याचा सीन पाहायला मिळाला. पहिल्या डावात बांगलादेशकडून ऑल राउंडर शाकिब अल हसन याने बऱ्यापैकी मैदानात तग धरला. पण चुकीच्या वेळी चुकीचा फटका मारुन तो ३२ धावांवर मागे फिरला.

गळ्यातला काळा धागा चघळत बॅटिंग करताना दिसला शाकिब 

शाकिब अल हसन हा नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. चेन्नई कसोटी सामन्यात बॅटिंग करतावेळी त्याने आपल्या एका वेगळ्या कृतीमुळे लक्षवेधून घेतलं. क्रिकेटच्या मैदानात फिल्डिंग किंवा बॅटिंग वेळी खेळाडू च्युइंगम चघळण्याचा सीन बहुंताश वेळा पाहायला मिळतो. पण शाकिब अल हसन बॅटिंग वेळी आपल्या गळ्यातील काळा धागा चघळताना स्पॉट झाले. शाकिबचे हे कृत्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचं अनोख मॅजिक आणि त्यामागचं लॉजिक काय असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. ज्याचं उत्तर या सामन्या दरम्यान समालोचन करणाऱ्या दिनेश कार्तिकनं दिलं आहे.

जाणून घ्या त्याच्या या सवयी मागचं मॅजिक अन् लॉजिक

कॉमेंट्री वेळी दिनेश कार्तिकनं बांगलादेशचा बॅटर शाकिब अल हसनच्या काळा धागा चघळण्यामागची स्टोरी काय? त्यासंदर्भातील किस्सा शेअर केला आहे. बांगलादेशचा क्रिकेटर तमिम इक्बालकडून त्यामागचं कनेक्शन काय ते कार्तिकनं जाणून घेतलं आहे. तो म्हणाला की,  त्याची जी ही सवय आहे ती त्याला बॅटिंगमध्ये फायदेशीर ठरते. बॅटिंग करताना एकाग्रता वाढवण्यासाठी त्याला याची मदत होते. एवढेच नाही तर त्यामुळे डोके लेग साइडला झुकत नाही. याचा अर्थ बॅटिंग करताना स्वत:वर नियंत्रण ठेवण्यासाठी शाकिब हे मॅजिक वापरतो. जे लॉजिकली त्याला गेम उंचावण्यास मदत करते, असे त्याला वाटते.

सेहवागही आपल्या वेगळ्या धुंदीत असायचा

क्रिकेटच्या मैदानातील आपल्या अजब गजब सवयीमुळे चर्चेत येणारा शाकिब अल हसन हा काही पहिली क्रिकेटर नाही. भारताचा माजी स्फोटक फलंदाज सेहवागलाही बॅटिंग करताना गाणे गुणगुणण्याची सवय होती. सेहवागसंदर्भातील हा किस्सा चांगलाच गालाही होता.   

टॅग्स :बांगलादेशभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ