आयपीएलच्या १८ व्या हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार अक्षर पटेलशिवायच संघ मैदानात उतरला आहे. नियमित कर्णधाराऐवजी फाफ ड्युप्लेसीस नाणेफेकीसाठी मैदानात आला. नाणेफेक जिंकून त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने अक्षर पटेलच्या अनुपस्थितीसंदर्भातील माहितीही दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अक्षर पटेल का नाही? फाफ म्हणाला...
टॉसनंतर फाफ ड्युप्लेसिस म्हणाला की, गेल्या दोन दिवसांपासून अक्षर पटेल हा आजारी आहे. त्यामुळेच आजच्या सामन्यात तो खेळू शकत नाही. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्लेऑफ्सचे तीन संघ ठरले आहेत. उर्वरित एका जागेसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ शर्यतीत आहेत. जर मुंबई इंडियन्सच्या संघाने हा सामना जिंकला तर दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास इथेच संपुष्टात येईल. अक्षर पटेल हा बॉलिंग बॅटिंगमध्ये उपयुक्त खेळाडू आहे. तो नसल्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी हा सामना आणखी सोपा झाला आहे.