वर्ल्ड चॅम्पियन शिवम दुबेवर का आली ट्रेनमधून प्रवास करण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण

दुबेने रेल्वेन प्रवास करण्याचा निर्णय का घेतला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:42 IST2026-03-11T19:33:50+5:302026-03-11T19:42:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Why Did Shivam Dube Travelled By Train After India Becoming World Champions Big Reason Revealed | वर्ल्ड चॅम्पियन शिवम दुबेवर का आली ट्रेनमधून प्रवास करण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण

वर्ल्ड चॅम्पियन शिवम दुबेवर का आली ट्रेनमधून प्रवास करण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण

भारतीय संघाचा स्टार खेळाडू शिवम दुबे टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील फायनलनंतर पत्नी अंजुमसोबत रेल्वेनं मुंबई गाठले. स्टार क्रिकेटरच्या रेल्वेचा प्रवास सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. आता या क्रिकेटवर रेल्वेनं प्रवास करण्याची वेळ का आली? यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. खुद्द शिवम दुबेनं यासंदर्भात खुलासा केला आहे.  

शिवम दुबेच्या रेल्वे प्रवासाची चर्चा

यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दहाव्या हंगामात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने ९६ धावांनी विजय नोंदवला. शिवम दुबेनं फायनलमध्ये अखेरच्या षटकात २६ धावा ठोकत मैफील लुटली होती. शिवम दुबे सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. ऐतिहासिक विजयानंतर त्याने पत्नीसह सयाजीनगरी एक्सप्रेस च्या थर्ड एसी डब्यातून अहमदाबाद ते मुंबई असा प्रवास केला. चाहत्यांनी आपल्याला ओळखू नये यासाठी त्याला चांगलीच कसरत करावी लागली. पण आता प्रश्न हा की, एवढ्या मोठ्या स्टारने विमानातून प्रवास न करता रेल्वे प्रवासाला पसंती का दिली? इथं जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी

कोणाला विश्वास बसेल? शिवम दुबेचा कुटुंबासोबत रेल्वेने प्रवास! टीटीईने विचारले, "क्रिकेटर का?", पत्नीने कसं ...
 
दुबेने रेल्वेन प्रवास करण्याचा निर्णय का घेतला?

 इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शिवम दुबे म्हणाला की, फ्लाइट तिकीट बूक करण्याचा प्रयत्न केला. पण एकही सीट उपलब्ध नव्हती. घरी पोहचण्याची घाई असल्यामुळे शेवटी रेल्वेनं प्रवास करण्याचे ठरवले. ४ वर्षांचा मुलगा अयान आणि २ वर्षांची मुलगी महविश ही मुंबईतील घरीच होती.  त्यामुळे घरी जाण्याची घाई होती. ज्यावेळी कुटुंबियात आम्ही रेल्वेनं प्रवास करत आहोत ते कळले त्यावेळी त्यांनाही चिंता वाटत होती, असेही शिवम दुबेनं सांगितले आहे.

सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन,  कशी राहिली शिवम दुबेची यंदाच्या हंगामातील कामगिरी

शिवम दुबे हा याआधी गत हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता. यंदाच्या हंगामात त्याने ९ सामन्यातील ८ डावात २३५ धावा केल्या.  भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संजू सॅमसन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्यानंतर तो चौथ्या स्थानावर राहिला.  यंदाच्या हंगामात त्याच्या भात्यातून १७ षटकार पाहायला मिळाले. याशिवाय गोलंदाजीतही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली,

Web Title : शिवम दुबे ने ट्रेन से यात्रा करने का कारण बताया।

Web Summary : शिवम दुबे ने टी20 विश्व कप फाइनल के बाद फ्लाइट टिकटों की अनुपलब्धता के कारण पत्नी के साथ ट्रेन से यात्रा की। अपने बच्चों को याद करते हुए, उन्होंने सयाजीनगरी एक्सप्रेस को चुना। उन्होंने विश्व कप में अपने प्रदर्शन पर भी प्रकाश डाला।

Web Title : Shivam Dube's train travel reason revealed by the cricketer himself.

Web Summary : Shivam Dube traveled by train with his wife after the T20 World Cup final due to unavailability of flight tickets. Missing his young children, he opted for the Sayajinagari Express, surprising fans and TTEs alike. He also shared insights on his World Cup performance.