Rohit Sharma Ritika Love Relationship: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करत आहे. २०२४च्या टी२० विश्वचषकानंतर त्याने टी२० मधून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर महिन्याभरापूर्वी रोहितने कसोटी क्रिकेटलाही रामराम ठोकला. त्यामुळे रोहित शर्मा सध्या कुटुंबासाठी वेळ देत आहे. याचदरम्यान, रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांनी एका मुलाखतीसाठी हजेरी लावली. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसरा यांनी हूज द बॉस या नवा चॅट शो सुरु केला. त्यात या दोघांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी हरभजनच्या धमाल प्रश्नांना रोहितने झकास उत्तरे दिले.
IPL मध्ये रोहित शर्मा आणि हरभजन सिंग दोघेही मुंबई इंडियन्स संघाकडून खेळायचे. दोघांच्या रूम एकमेकांच्यासमोर होत्या. त्यावेळी रोहितच्या रूममध्ये रितिका अनेकदा दिसायची. रोहित-रितिकाच्या लग्नाच्या खूप आधीची ही गोष्ट आहे. त्यावेळी ती तुझ्या रूममध्ये का दिसायची, असा प्रश्न हरभजनने विचारला. त्यावर रोहित म्हणाला, "आम्ही त्या वेळी डेटिंग करत नव्हतो. आम्ही दोघे केवळ एकत्र असायचो. पण आमच्यात प्रेम नव्हतं, केवळ मैत्री होती. हॉटेलपासून रितिकाचे घर अवघ्या ५ मिनिटांवर होते. क्रिकेट सुरु असताना हॉटेलमधले जेवण जेवायचा खूप कंटाळा यायचा. त्यामुळे मी तिला घरात बनवलेलं जेवण आणायला सांगायचो. क्रिकेटचा सराव झाल्यावर जेव्हा मी हॉटेलवर परत यायचो तेव्हा ती माझ्यासाठी जेवण आणायची आणि मग आम्ही एकत्र बसून जेवायचो."
"रितिका २००८ पासून माझी मॅनेजर होती. त्यामुळे आमच्यात खूप छान मैत्री होती. तिचे मित्र माझ्या रूममध्ये गप्पा मारायला यायचे. माझ्या बऱ्याच मित्रांनी ती ओळखायची. पण आमच्यात डेटिंग सुरु नव्हते. २०१४च्या आसपास आम्हाला वाटले की आपण एकत्र आयुष्य घालवण्याचा विचार करूया. तोपर्यंत आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र होतो. इतर खेळाडू आणि लोक आम्हाला चिडवायचे, पण आम्हाला त्याचं आश्चर्य वाटायचं. नंतर हळूहळू आम्हीही त्याबद्दल विचार केला. मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, लग्न झालं आणि आता आम्हाला दोन गोड मुलंही आहेत," असेही रोहित-रितिका उत्तर देताना म्हणाले.