Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 Prize Money : टी-२० वर्ल्ड कप विजेत्यासह उपविजेता संघही होणार मालामाल; कुणाला किती कोटी मिळणार?

सेमीतून आउट झालेल्या संघासह अन्य कोणत्या क्रमांकावरील संघाला किती बक्षीस मिळणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 16:56 IST

Open in App

T20 World Cup 2026 Prize Money : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील दहाव्या हंगामातील विजेता कोण? याचा फैसला जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात जेतेपदासाठीची लढत पाहायला मिळाले. या सामन्यातील विजेत्या संघासह उप विजेता संघही मालमाल होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेन या स्पर्धेसाठी कोट्यवधीच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. इथं एक नजर टाकुयात कोणत्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला ICC कडून किती बक्षीस रक्कम मिळणार? यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ICC कडून १२० कोटी रुपयांच्या प्राइज पूलची घोषणा या स्पर्धेसाठी आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) एकूण १२० कोटी रुपयांच्या प्राईज पूलची घोषणा केली आहे. गत हंगामाच्या तुलनेत बक्षीस रक्कमेत तब्बल २० टक्के इतकी घवघवीत वाढ करण्यात आली आहे. विजेता आणि उपविजेत्या संघाशिवाय सेमीफायनल, सुपर ८ आणि पहिल्या फेरीत बाद झालेल्या संघांनाही बक्षीस रक्कम दिली जाणार आहे.

अंधश्रद्धा की 'अपशकुन'? T20 World Cup फायनलआधी टीम इंडियानं बदलला मुक्काम! कारण...

विजेत्या संघासह उपविजेत्याला मिळणार कोट्यवधींच बक्षीस

टी-२० विश्वचषक २०२६ जिंकणाऱ्या संघाला सुमारे ३ मिलियन डॉलर, म्हणजेच जवळपास २७ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या उपविजेत्या संघाला सुमारे १४ कोटी रुपये बक्षीस दिले जाईल.

सेमीतून आउट झालेल्या संघासह अन्य कोणत्या क्रमांकावरील संघाला किती बक्षीस मिळणार? 

या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ पोहोचले होते. सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांना प्रत्येकी सुमारे ७.२४ कोटी रुपये दिले जाणार आहेत. ५ ते १२ क्रमांकावर असलेल्या संघांना सुमारे ३.४८ कोटी रुपये तर १३ ते २० क्रमांकावर राहिलेल्या प्रत्येक संघाला जवळपास २.२९ कोटी एवढी रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाईल. 

टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात फक्त भारतासह इंग्लंड आणि वेस्ट इंडिज याच संघांनी दोन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. भारतीय संघाने २००७ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पहिली वहिली स्पर्धा गाजवली होती. त्यानंतर गत हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने जेतेपद मिळले. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला सर्वाधिक तीन वेळा ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. आतापर्यंतच्या इतिहासात दोन वेळा किंवा यजमान संघाने एकदाही ही ट्रॉफी जिंकलेली नाही. भारतीय संघ न्यूझीलंडला पराभूत करून हा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : T20 World Cup 2026: Prize money details announced for winners, runners-up.

Web Summary : ICC announced ₹120 crore prize pool for T20 World Cup 2026. The winner gets ₹27 crore, runner-up ₹14 crore. Semi-finalists receive ₹7.24 crore each, with other teams also awarded prizes. India eyes a record third title.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध न्यूझीलंडआयसीसीटी-20 क्रिकेटबीसीसीआय