Join us

WTCच्या फायनलमध्ये कोणाला मिळणार संधी?; इरफान पठाणने जाहीर केली टीम इंडियाची Playing XI

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने भारताची प्लेइंग ११ जाहीर केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 19:58 IST

Open in App

७ ते ११ जून या कालावधीत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल होणार आहे. भारतीय संघातील खेळाडू कसून सराव देखील करत आरहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी अद्याप टीम इंडियाच्या प्लेइंग ११ बाबत संभ्रम कायम आहे. मात्र याचदरम्यान भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने भारताची प्लेइंग ११ जाहीर केली आहे. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघांची जोरदार तयारी सुरु आहे. दोन्ही संघांचे खेळाडू इंडियन प्रीमियरमध्ये खेळताना दिसले, आता ते कसोटीच्या फॉरमॅटमध्ये खेळतील. दरम्यान, टीम इंडियाला एकीकडे दुखापतींचं ग्रहण लागलं असताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध मैदानावर नेमकं कोण उतरणार यावर अजूनही चर्चा सुरु आहे.

इरफान पठाणची WTC फायनलसाठी प्लेइंग ११-

रोहित, शुभमन, पुजारा, कोहली, रहाणे, किशन, जडेजा, अश्विन/शार्दुल, शमी, उमेश, सिराज

ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढणार!

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे भारताला मधल्या फळीत एक्स-फॅक्टरची उणीव भासेल. मधल्या फळीत ऋषभ पंतच्या एक्स-फॅक्टरची कमतरता ईशान किशन भरून काढू शकतो. इशान किशनने निवडकर्त्यांना दाखवून दिले आहे की त्याच्यात मोठी खेळी खेळण्याची ताकद आहे. त्यामुळे त्याच्या संघातील समावेशाने ऑस्ट्रेलियाचे टेन्शन वाढणार हे नक्की.

WTC फायनलसाठी भारतीय संघ- 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट. 

राखीव खेळाडू- यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.  

WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ- 

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), स्कॉट बोलँड, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, अॅलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, मार्क हॅरिस, जोस हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क.  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App