Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं

कोण आहे यश राठोड? ज्यानं फायनलमध्ये केला मोठा पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:16 IST2025-09-13T18:12:46+5:302025-09-13T18:16:58+5:30

whatsapp join usJoin us
Who Is Yash Rathod? Vidarbha’s Run-Machine Missed Double Ton In Duleep Trophy Final | Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं

Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Who Is Yash Rathod? He Misses Maiden Double Ton In Duleep Final : बंगळुरु येथील बीसीसीआयच्या एक्सेलेन्स ग्राउंडवर रंगलेल्या दुलीप करंडक स्पर्धेतील फायनल लढतीत मध्य विभाग संघाकडून खेळणाऱ्या विदर्भकरानं आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या उभारली. पहिल्या डावात दमदार खेळी करत २५ वर्षीय यश राठोडनं (Yash Rathod) १९४ धावा कुटल्या.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अवघ्या ६ धावांनी हुकलं द्विशतक

फायनलमध्ये द्विशतकी डाव साधण्याच्या तो अगदी उंबरठ्यावर पोहचला असताना  गुरजापनीत सिंग (Gurjapneet Singh) याने त्याला क्लीन बोल्ड केले. यश राठोड याने या सामन्यात २८६ चेंडूत १७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १९४ धावांची खेळी केली.

कोण आहे यश राठोड? ज्यानं फायनलमध्ये केला मोठा पराक्रम

यश राठोडचा जन्म १६ मे २००० मध्ये नागपूरात झाला. उजव्या हाताचा हा फलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतो. २०१९ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या एसीसीच्या इमर्जिंग टीम्स आशिया कप स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. नेपाळ विरुद्ध लिस्ट एमध्ये पदार्पण करणाऱ्या यश राठोडनं २०२०-२१ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतून विदर्भ संघाकडून टी-२० मध्ये पदार्पण केले होते. यश राठोड याने सर्व प्रकारात आपली छाप सोडलीये. पण रेड बॉल क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी अधिक लक्षवेधी ठरते. 

Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल

विदर्भाची रन मशीनच!

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत त्याने २१ प्रथम श्रेणी सामन्यात ५० पेक्षा अधिकच्या सरासरीनं १८६६ धावा केल्या आहेत. यात ७ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. दुलीप करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात केलेल्या १९४ धावांच्या खेळीआधी १५१ ही त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती. गत हंगामत विदर्भ संघाला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात यशनं मोठा वाटा उचलला होता. १८ डावात त्यानं ९६० धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणीतील त्याची कामगिरी तो विदर्भाची रन मशीन असल्याचे सिद्ध करणारी आहे.

मध्य विभाग संघ जेतेपदाच्या उंबरठ्यावर

यश राठोडशिवाय मध्य विभाग संघाचा कर्णधार रजत पाटीदार याच्या भात्यातून शतक पाहायला मिळाले. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर दुलीप करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये मध्य विभाग संघाने ५११ धावा करत दक्षिण विभाग संघाविरुद्ध ३६२ धावांची मोठी आघाडी घेतलीये.  तिसऱ्या दिवसाअखेर दक्षिण विभाग संघ २३३ धावांनी पिछाडीवर असून मध्य विभाग जेतेपदाच्या उंबरठ्यावर आहे.
 

Web Title: Who Is Yash Rathod? Vidarbha’s Run-Machine Missed Double Ton In Duleep Trophy Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.