IRE vs Oman Aamir Kaleem Oldest to Score A T20 WC Fifty : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील २२ व्या सामन्यात आयर्लंडच्या संघाने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या उभारत ओमानच्या संघाला ९६ धावांनी पराभूत करत सामना जिंकला. पण धावांचा पाठलाग करताना ओमानच्या अमिर कलीम याने आपल्याच सहकाऱ्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत नवा इतिहास रचला आहे. याआधी ओमानच्या ताफ्यातील मोहम्मद नदीम ४३ वर्षे आणि १६१ दिवस वय असताना टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात वयस्कर अर्धशतकवीर ठरला होता. आता हा विक्रम आमिर कलीमच्या नावे झाला आहे. कोलंबोच्या मैदानात त्याने ४४ वर्षे ८६ दिवस वय असताना अर्धशतक झळकावले आहे. त्याची ही विश्वविक्रमी कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. पण त्याने वय फक्त आकडा हे दाखवून देताना सनथ जयसूर्या, शोएब मलिक आणि तिलकरत्ने दिलशान या दिग्गजांनाही मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात वयस्कर अर्धशतकवीर
लॉर्कन टकर ९४(५१)* आणि गेराथ डिलेनी ५६ (३०) आणि जॉर्ज डॉकरेल ३५ (९) यांच्या वादळी खेळीच्या जोरावर आयर्लंडच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २३५ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर अमीर कलीम याने २९ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५० धावांची खेळी केली. तो टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात वयस्कर अर्धशतकवीर ठरला. त्याच्याशिवाय हम्मद मिर्झाने ३७ चेंडूत केलेल्या ४६ धावांची खेळी वगळता ओमानच्या संघातील एकालाही मैदानात तग धरता आला नाही. परिणामी संघाचा डाव १८ षटकात १३९ धावांवर आटोपला.
T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात वयाने फिफ्टी (५०+) करणारे खेळाडू
- ४४ वर्षे ८६ दिवस – आमिर काळीम (ओमान) vs आयर्लंड, कोलंबो SSC, २०२६
- ४३ वर्षे १६१ दिवस – मोहम्मद नादेम (ओमान) vs श्रीलंका, पल्लेकले, २०२६
- ३९ वर्षे ३४५ दिवस – सनाथ जयसुरीया (श्रीलंका) vs वेस्ट इंडीज, ट्रेंट ब्रिज, २००९
- ३९ वर्षे २७९ दिवस – शोएब मलिक (पाकिस्तान) vs स्कॉटलंड, शारजाह, २०२१
- ३९ वर्षे १५५ दिवस – तिल्लाकारत्ने दिलशन (श्रीलंका) vs अफगाणिस्तान, कोलकाता, २०१६
Web Summary : Oman's Aamir Kaleem, at 44, became the oldest to score a T20 World Cup fifty against Ireland, surpassing his teammate Mohammad Nadeem and legends like Jayasuriya and Shoaib Malik. Despite his record-breaking innings, Oman lost the match.
Web Summary : ओमान के आमिर कलीम, 44 वर्ष की आयु में, आयरलैंड के खिलाफ टी20 विश्व कप में अर्धशतक बनाने वाले सबसे उम्रदराज खिलाड़ी बन गए, उन्होंने अपने टीम के साथी मोहम्मद नदीम और जयसूर्या और शोएब मलिक जैसे दिग्गजों को पीछे छोड़ दिया। रिकॉर्ड तोड़ने वाली पारी के बावजूद, ओमान मैच हार गया।