WTC Final 2025 South Africa vs Australia : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनल सामना रंगणार आहे. ११ जून रोजी दोन्ही संघ लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात कसोटीतील चॅम्पियन होण्याच्या इराद्याने मैदानात उतरलीत. गत हंगामात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला पराभूत करत ही स्पर्धा जिंकली होती. ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियनचा आपला रुबाब कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदाच फायनल खेळताना दिसेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पावसाने बॅटिंग केली तर राखीव दिवस आहे, पण..
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील ११ ते १५ जून या कालावधीत रंगणाऱ्या या मेगा फायनल लढती वेळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी आयसीसीने फायनल लढतीसाठी १६ जून हा एक राखीव दिवसही ठेवला आहे. पण त्यातूनही जर सामना अनिर्णित राहिला तर काय? या परिस्थितीत कोण उचलणार चांदीची गदा? जाणून घेऊयात सविस्तर
Video: ऋषभ पंतने फोडलं लॉर्ड्स स्टेडियमचं छत; गुडघ्यावर बसून ठोकला धडाकेबाज षटकार
WTC 2025 Final अनिर्णित राहिली तर काय?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अव्वलस्थानासह फायनलचं तिकीट मिळवले आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ हा दुसऱ्या स्थानासह फायनलसाठी पात्र ठरलाय. जर अंतिम लढत अनिर्णित राहिली तर आयसीसीच्या १६.३.३ नियमानुसार, दोन्ही संघांना संयुक्तरित्या जेतेपद दिले जाईल. एवढेच नाही तर बक्षीसाची रक्कमही समान पद्धतीने वाटली जाईल.
विजेत्यासह उपविजेत्याला मिळणार एवढे कोटी
आयसीसीनं WTC स्पर्धेतील फायनल आधीच विजेत्या आणि उप विजेत्या संघासह अन्य संघांना मिळणाऱ्या बक्षीसांची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला ३.६ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार, जवळपास ३०.७ कोटी एवढे रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाणार आहे. उप विजेत्याला २.१६ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार, जवळपास १८.५३ कोटी रुपये बक्षीस रोख स्वरुपात दिले जाणार आहे.
WTC फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
टोनी डी झॉर्झी , रायन रिकल्टन, एडन माक्ररम, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरिन, वियान मुल्डर, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी.
असा आहे ऑस्ट्रेलियन संघ
उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, एलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, कॅमरून ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, स्कॉट बोलँड, नॅथन लियोन, मॅट कुहनेमॅन.