किती असेल भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीरची सॅलरी? राहुल द्रविडपेक्षा जास्त मिळणार की कमी?

बीसीसीआयने मंगळवारी (9 जुलै) गौतम गंभीरच्या नावाची भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. आता द्रविडच्या जागी आलेल्या या दिग्गजाची सॅलरी किती असेल? द्रवीच्या सॅलरी एवढी की कमी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:43 PM2024-07-10T23:43:13+5:302024-07-10T23:44:27+5:30

whatsapp join usJoin us
What will be the salary of new coach of the Indian team Gautam Gambhir more or same as rahul dravid | किती असेल भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीरची सॅलरी? राहुल द्रविडपेक्षा जास्त मिळणार की कमी?

किती असेल भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीरची सॅलरी? राहुल द्रविडपेक्षा जास्त मिळणार की कमी?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला चॅम्पियन बनवणाऱ्या राहुल द्रवीडच्या प्रशिक्षकपदाचा करार या स्पर्धेबरोबर संपुष्टात आला. यानंतर, बीसीसीआयने मंगळवारी (9 जुलै) गौतम गंभीरच्या नावाची भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. आता द्रविडच्या जागी आलेल्या या दिग्गजाची सॅलरी किती असेल? द्रवीच्या सॅलरी एवढी की कमी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारीअधिकृतपणे गंभीरच्या नियुक्तीची घोषणा केली. मात्र, त्याची सॅलरी अद्याप ठरलेली नसल्याचे समजते. मात्र, त्याची सॅलरी राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांना मिळणाऱ्या सॅलरीप्रमाणेच असणे अपेक्षित आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडला बीसीसीआयकडून वार्षिक 12 कोटी रुपये एढी सॅलरी मिळत होती. गंभीरलाही तेवढीच रक्कम ऑफर करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

द्रवीडच्या सॅलरी एवढीच असेल गंभीरची सॅलरी -
बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयसोबत बोलताना म्हटले आहे की, ‘‘गौतम गभीरसाठी जबाबदारी स्वीकारणे अधिक महत्वाचे होते. सॅलरी तथा इतर गोष्टींवर काम केले जाऊ शकते. हे 2014 मधील रवि शास्त्रींसारखेच आहे. तेव्हा त्यांना मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या जागेवर प्रथमच क्रिकेट संचालक बनवण्यात आले होते. जेव्हा रवि शास्त्री यांनी जबाबदारी स्वीकारली होती, तेव्हा तर त्यांचा करारही करण्यात आलेला नव्हता. नंतर सर्व गोष्टी पूर्ण करण्यात आल्या. नंतर सर्व गोष्टी पूर्ण करण्यात आल्या. गौतम गंभीरच्या प्रकरणातही काही बारीक-सारीक गोष्टींवर काम सुरू आहे. त्याची सॅलरी राहुल द्रविड एवढीच असेल.’’

Web Title: What will be the salary of new coach of the Indian team Gautam Gambhir more or same as rahul dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.