Join us

तो बरंच काही विसरत असेल; पण रोहित भाऊनं 'सतरा' आकडा बरोबर लक्षात ठेवलाय (VIDEO)

जाणून घेऊयात दोघांच्यात नेमकं कशासंदर्भात रंगल्या होत्या गप्पा गोष्टी यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:44 IST

Open in App

Rohit Sharma-Ravindra Jadeja Viral Video : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा मैदानातील कामगिरीशिवाय फिल्डबाहेरील आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. अनेकदा  त्याच्या विसरभोळ्या स्वभावाची चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आता जड्डूसोबतचा त्याचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात रोहितची स्मरणशक्ती अफलातून आहे, असेच काहीस चित्र दिसून येते. दोघांचा कारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. जाणून घेऊयात दोघांच्यात नेमकं कशासंदर्भात रंगल्या होत्या गप्पा गोष्टी यासंदर्भातील सविस्तर माहिती

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बीसीसीआयनं शेअर केलाय रोहित-जड्डूचा खास व्हिडिओ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात ही जोडी कारमधून प्रवास करत असल्याचे दिसून येते. दोघांच्या गप्पा गोष्टीतून हा व्हिडिओ आयसीसी मीडिया इवेंटसाठी जातानाचा आहे ते स्पष्ट होते. 

जड्डूचा सवाल अन् रोहितचा जवाब

रवींद्र जडेजा रोहित शर्माला तू कितव्या आयसीसी इवेंटमध्ये सहभागी होत आहेस? असा प्रश्न विचारतो. यावर रोहित शर्मा म्हणतो की, त्याने ९ टी२० वर्ल्ड कपशिवाय ३ वनडे वर्ल्ड कप, २ वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २ वेळा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असे १७ वेळा या लोकांनी मला बोलावलं आहे, असे उत्तर रोहित देतो. रोहित शर्मा भलेही वस्तू विसरत असेल पण मैदानात काय झालं अन् किती वेळा आपण कुठं खेळलो हे तो विसरत नाही, हीच गोष्ट या  व्हिडिओमधून स्पष्ट होते. 

टीम इंडिया दुबईला पोहचली, फोटो सेशन झालं, आता... 

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दुबईला रवाना झाला आहे. १९ फेब्रुवारीला स्पर्धेची सुरुवात होण्याआधी भारतीय संघाचे खास फोटोशूट झाले. त्याआधी रोहित शर्मा आणि जड्डूचा खास अंदाज पाहायला मिळाला. भारतीय संघ २० फेब्रुवारीला या स्पर्धेतील आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळताना दिसेल. भारतासह 'अ' गटात यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाचाही समावेश आहे. भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासह दमदार विजयासह स्पर्धेत धमाका करण्यासाठी प्रयत्नशील असेल. 

टॅग्स :रोहित शर्मारवींद्र जडेजाचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५आयसीसीबीसीसीआयभारत विरुद्ध बांगलादेशभारत विरुद्ध पाकिस्तान